बरीच अशी कलाकार मंडळी आहेत जी त्यांना येणारे अनुभव वेळोवेळी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. सोशल मीडियाद्वारे ही कलाकार मंडळी व्यक्त होताना दिसतात. अशातच काही कलाकार बरेचदा ट्राफिकमध्ये वा वाहन चालवताना प्रवासादरम्यान आलेले चांगले-वाईट अनुभव शेअर करताना दिसतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिला प्रवासादरम्यान आलेला वाईट अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री म्हणजेच अश्विनी कासार. (Ashwini Kasar Shared Experience)
अश्विनीने सोशल मीडियाद्वारे शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. आजवर अश्विनीने अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अश्विनी मालिकांशिवाय ट्रेंडिंग रीलवर व्हिडीओ बनवण्यात कायमच सक्रिय असते. सोशल मीडियावर अश्विनीचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आणखी वाचा – अहिल्यादेवींचा ऍडशूटसाठी होकार, दिशा-दामिनीची नवी चाल, प्रोजेक्ट होईल का पूर्ण?

अशातच अश्विनीने शेअर केलेल्या इंस्टाग्राम स्टोरीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्टोरीमध्ये अश्विनीने लोकल ट्रेन प्रवासादरम्यान आलेला एक वाईट अनुभव शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत अश्विनीने माणसांची वाईट प्रवृत्ती कशी असते हे दाखवले आहे आणि मुंबई पोलिसांनाही ही गोष्ट टॅग केलेली पाहायला मिळत आहे. अश्विनीच्या स्टोरीमध्ये एक बाई तिच्या समोरच्या सीटवर बसलेली पाहायला मिळत आहे. मात्र तिला ट्रेनमध्ये गर्दी नसल्यामुळे अश्विनी जिथे बसली आहे तिथे तिला पाय सोडून बसायचे असतात मात्र अश्विनी समोरच्या सीटवर पाय सोडून बसण्यास तिला साफ नकार देते.
यावर त्या बाईची अरेरावी ही अश्विनीने या व्हिडीओद्वारे शेअर केली आहे. या व्हिडीओसह तिने कॅप्शन देत असे म्हटले आहे की, “या बाईंचं नाव मला माहित नाही. ट्रेनमध्ये यांना माझ्या सीटवर पाय सोडून बसायचं होतं. मी नकार दिल्यावर मला लाथ मारण्यात आली. भांडणात मी मराठी भाषा वापरली तर त्यांना त्याचाही त्रास होत होता. मी पब्लिक इमेज आहे हे कळल्यावर मला धमक्या देण्यात आल्या. माझा मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, अशी संतापजनक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली.