‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्य आणि पारूची नवग्रहांची पूजा संपन्न होते त्यानंतर दोघेही देवीचा आशीर्वाद घेतात आणि त्यावेळेला पारूचा पाय घसरतो आणि ती त्रिशूळावर पडायला जाते मात्र आदित्य तिला पकडतो आणि सावरतो. हे सगळं सगळेजण पाहत असतात. मात्र आदित्य पारूचा पाय घसरला अशी सारवासारव करत तिची बाजू घेतो. आणि ही परिस्थिती सांभाळून घेतो. त्यानंतर इकडे सगळे घरी आल्यावर पारूला वाईट वाटत असतं की, अहिल्यादेवी मला माझ्या वागणुकीमुळे ओरडल्या तसेच माझ्या बालासुद्धा ऐकून घ्यावं लागलं म्हणून ती काळजी व्यक्त करत असते तितक्यात सावित्री आत्या येते आणि पारूला समजावून सांगते. त्यानंतर इकडे घरी सगळेजण बसलेले असतात तेव्हा पारू काहीतरी घेऊन येते तेव्हा दिशा दिला विचारते, अग तुझी एंगेजमेंट रिंग कुठे आहे?, हे कळल्यावर पारूच्या लक्षात येत की, आपली एंगेजमेंट रिंग आपल्या हातात नाही आहे. (Paaru Serial Update)
त्यानंतर अहिल्यादेवी विचारतात पारू तुझी रिंग कुठे काढून ठेवली आहेस का?, हा तुझ्या सौभाग्याचा अलंकार आहे. तू असं करणं चुकीचं आहे. यावर पारुला काहीच आठवत नाही पारू रडू लागते सांगते की, मला खरंच आठवत नाही आहे की मी माझी अंगठी कुठे काढून ठेवली. तितक्यात तिथं आदित्य येतो आणि आदित्यच्या हातात ती अंगठी असल्याचं दामिनी बघते आणि दामिनी मोठा गाजावाजा करते. त्यावेळेला आदित्य सॉरी आई सॉरी आई करत घडलेला सगळा प्रकार सांगतो. अहिल्यादेवी ती अंगठी आदित्यला पारूला पुन्हा द्यायला सांगतात आणि ती अंगठी आदित्य पारुला पुन्हा करतो. त्यानंतर पारू किचनमध्ये निघून जाते तेव्हा दामिनी तिच्या मागोमाग येते आणि पारूला नको नको ते बोलू लागते.
तितक्यात तिथे प्रीतम येतो आणि सगळं काही पाहतो आणि जाऊन अहिल्यादेवींना बोलावून घेऊन येतो. त्यावेळेला अहिल्यादेवी आल्यावर दामिनी असं बोलत असते की, आदित्यला तू नादाला लावत आहेस का?, आदित्यच्या तू जवळ जाण्याचा, त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेस का?, साखरपुड्याला तू एवढी महागडी साडी कशी नेसलीस?, तू आदित्यकडून यासाठी पैसे उकळले आहेस का? हे ऐकून अहिल्यादेवींचा संताप अनावर होतो. त्यानंतर अहिल्यादेवी सगळ्यांना किचनबाहेर जाण्यास सांगतात आणि फक्त पारू आणि दामिनीला तिथे थांबायला सांगतात आणि पारूच्या जवळ येतात तेव्हा दामिनी खूप खुश होते मात्र अहिल्यादेवी दामिनीच्या सणसणीत कानाखाली लगावतात आणि सांगतात की, माझ्या आदित्यबद्दल यापुढे एक शब्द जरी बोललीस तर तुला गावाकडे पाठवून देईन. तितक्यात दामिनी काहीतरी बोलायला जाते तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की पुन्हा एक शब्द बोललीस तर सगळ्या नोकरांसमोर तुझ्या दुसरी कानाखाली पडेल. हे सर्व प्रीतम आणि आदित्य लपून-छपून बघत असतात.
त्यानंतर मालिकेच्या पुढील भागात आदित्यला एका कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं असत. आदित्य त्याबद्दल अहिल्यादेवीला सांगतो. मात्र लग्नाच्या या ऍडसाठी पारू काम करणार नाही. त्यामुळे ही डील कॅन्सल करायला त्या आदित्यला लावतात. आता पारू ब्रँड अँबेसिडर म्हणून हे काम कसं करणार?, अहिल्यादेवींकडून परवानगी कशी मिळवणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.