जान्हवी कपूर सध्या खूप चर्चेत आहे. तिचा व राजकुमार राव यांचा नवीन चित्रपट ‘मि अँड मिसेस माही’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व राजकुमार व्यस्त आहेत. तिचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसच अनेक मुलाखतीच्या माध्यमातूनदेखील ती अनेक मुद्यांवर भाष्य करताना दिसत आहे. यावेळी तिने फोटोग्राफर्सबद्दल भाष्य केले असून ती यामुळे अधिक चर्चेत आली आहे. तिच्या एका विधानामुळे फोटोग्राफर्सची पोलखोल झालेली दिसून येत आहे. (janhvi kapoor on paparazzi)
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी ‘लल्लनटॉप’ला मुलाखत देण्यासाठी पोहोचली. तिने फोटोग्राफर्सना ‘सेलिब्रिटींचे रेशन कार्ड’ म्हणून संबोधले आहे. तिने सांगितले की, “आता चित्रपटाचे प्रमोशन सुरु आहे. त्यामुळे फोटोग्राफर्सना एअरपोर्टवर फोटो क्लिक करण्यासाठी बोलावले होते. पण जेव्हा प्रमोशन नसते, मी शूटवर जाणार नसेन तेव्हा मला या सगळ्यापासून लांब राहायला आवडते. तेव्हा जर त्यांनी अधिक कष्ट घेतले म्हणजे अनेकदा गाडीला देखील फॉलो करावे लागते. पण त्यावेळी त्यांना प्रत्येक फोटोचे पैसे मिळतात. हे फोटोग्राफर्स प्रत्येक कलाकाराचे रेशन कार्डच असतात”.
पुढे ती म्हणाली की, “प्रत्येकाच्या फोटोला काही ना काही किंमत असते. जर तुमच्या फोटोची किंमत जास्त असेल तर ते येतात. गाडीच्या मागे धावतात. पण जर किंमत कमी असेल तर केवळ इव्हेंटच्या इथे पोहोचतात. त्यांना बोलावलं तर येतात पण कधीकधी येत नाहीत. माझ्या या चित्रपटाच्या निमित्ताने मी जवळपास २५ ते ३० वेळा विमानाने प्रवास केला. मात्र चार ते पाच वेळाच मीडिया फोटो काढण्यासाठी तिथे पोहोचले”.
जीमबाहेर फोटो काढण्यावरुनदेखील तिने खुलासा केला. ती म्हणाली की, “लोकांनी मला घट्ट कपड्यांमध्ये पाहू नये असे मला वाटते. हे फोटो जर लोकांच्या समोर आले तर किती घट्ट कपडे घालते असे सगळे जण बोलतात. त्यापेक्षा फोटो न काढलेले बरे असे वाटते. मी त्यांना जीमच्या बाहेर बोलावत नाही. तसकह त्यांनी तिथे येऊ नये अशी विनंतीदेखील मी केली आहे. त्यानंतर ते आले नाहीत”.
जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘मि अँड मिसेस माही’ या चित्रपटात राजकुमारबरोबर दिसणार असून हा चित्रपट ३१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.