झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. मालिकेत एकामागून एक येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे. मालिकेत नुकतंच विरोचकाने राजाध्यक्ष कुटूंबातील केतकी काकु, फाल्गुनी, शेखर, तन्मय व तेजस या सर्वांना वश केले असल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता तिच्या वशमधून हे सगळेच बाहेर आले आहेत.
ग्रहण संपल्यामुळे रुपालीची वशीकरणाची शक्ती संपली. तसेच देवीआई मूर्च्छित पडली होती, ती आता त्यातून बाहेर आली आहे. त्यामुळे आता देवीआईच्या लेकी म्हणजेच नेत्रा व इंद्राणी आता रुपालीविरुद्ध लढू शकणार आहेत. अशातच नुकत्याच झालेल्या भागात शेखर राजाध्यक्ष रुपालीला तिचा अंत जवळ आला असल्याचा इशारा देतानाचे पहायला मिळाले.
यावेळी रुपाली शेखरच्या डोळ्यात डोळे घालून त्याला वश करण्याचा प्रयत्न करत असते, मात्र रुपालीची ही खेळी शेखर ओळखतो आणि तिला असं म्हणतो की, “तू मला बिनडोक म्हणतेस ना?, पण खरी बिनडोक तर तुच आहेस. शक्ती नसतानासुद्धा मला वश करण्याचा प्रयत्न करत आहेस. डोळ्यात डोळे घालायला सांगते आहेस. एवढं सगळं घडून सुद्धा मी शांत का आहे, माहीत आहे का? कारण तुझा अंत आता जवळ आला आहे आणि तो नेत्राच्याच हातून होणार आहे. त्यामुळे मी कशाला धडपड करु ना? मी आता शांतच राहणार आणि तुझा अंत पाहणार”.
अशातच आता राजाध्यक्ष कुटुंबीय पाचव्या पेटीच्या शोध घेणार आहेत. देवीआईच्या लेकी व राजाध्यक्ष कुटुंबातील सगळेजण चौथ्या पेटीच्या श्लोकाचा अर्थ समजून घेऊन पाचव्या पेटीचा शोध घेणार आहेत. त्यामुळे आता रुपालीच्या वशीकरणाच्या शक्तीतून बाहेर आल्यानंतर राजाध्यक्ष कुटुंबियांना पाचव्या पेटीचा शोध लागणार का? यात नेमकं काय दडलेलं असणार हे आता आगामी भागांत पाहायला मिळणार आहे. तसेच शेखरच्या म्हणण्याप्रमाणे रुपालीचा अंत होणार आहे का? याचे सगळेच जण आतुरतेने वाट पाहत आहेत.