छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. गेले काही वर्षे हा कार्यक्रम महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांचेदेखील भरभरून मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने समीर चौघुले, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, अरुण कदम, प्रभाकर मोरे, श्याम राजपूत यांसह गौरव मोरे, शिवाली परब, वनिता खरात, प्रियदर्शिनी, ईशा, पृथ्विक प्रताप यांसारख्या नवोदित कलाकारांनादेखील चांगलीच लोकप्रियता मिळाली. याच फळीत नव्याने सहभागी झालेले कलकार म्हणजे प्रथमेश शिवलकर व श्रमेश बेटकर ही जोडी.
आपल्या विनोदी अभिनय व लेखनाने चर्चेत राहणारा प्रथमेश त्याच्या सोशल मीडियाद्वारेही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याच्या कामानिमित्त माहिती व त्याचे काही फोटो व व्हिडीओही शेअर करत असतो. अशातच त्याने शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. काही दिवसांपूर्वी प्रथमेश शिवलकरने आई-बाबांबरोबरचा खास फोटो पोस्ट केला होता. यामध्ये त्यांच्या घरी एका नव्या कुटुंब सदस्याचं आगमन झाल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्याने त्याच्या नवीन गाडीबद्दलची पोस्ट शेअर केली होती.
आणखी वाचा – कन्या, तूळ व मकर राशीसाठी मंगळवारचा दिवस आर्थिक लाभाचा, तर काहींच्या अडचणी वाढणार, जाणून घ्या…
अशातच त्याने शेअर केलेली आणखी एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्याने नुकतंच त्याच्या गावी नवं शेतघर बांधलं असून या नवीन घराचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच त्याने यानिमित्ताने एक खास पोस्टही लिहिली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “शहरापासून दूर हक्काची एक वास्तु असावी; जिथे निर्मळ शांतता अनुभवता यावी. मातीच्या सुगंधाने प्रत्येक काहस्न दुर्वाळत राहावा ,अशी वास्तु साकार झाली आहे आणि त्याचं नाव आहे शिवार्पण”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची घोषणा, कोणत्या स्पर्धकांची शोमध्ये होणार एंट्री?, प्रोमोने वेधलं लक्ष
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “ज्या वास्तुत आपण लहानाचे मोठे होतो, त्या वास्तुला जेव्हा मोठं करण्याची संधी आपल्याला मिळते. तेव्हा त्या वास्तुचे ऋण फेडण्याचा केलेला छोटा प्रयत्न म्हणजेच ‘शिवार्पण’”. दरम्यान, प्रथमेशने शेअर केलेल्या या पोस्टला त्याच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच त्याच्या नवीन शेतघरानिमित्त त्याचे कौतुक व अभिनंदनही केलं आहे.