रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘बिग बॉस’मध्ये काहींना मी आवडले नाही आणि…”, मालिकेमध्ये पुन्हा एन्ट्री केल्यानंतर वीणा जगतापचं वक्तव्य, म्हणाली, “काही लोकांनी…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 21, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rama raghav fame Veena Jagtap revealed that some people did not like me in 'Bigg Boss'

"'बिग बॉस'मध्ये काहींना मी आवडले नाही आणि...", मालिकेमध्ये पुन्हा एन्ट्री केल्यानंतर वीणा जगतापचं वक्तव्य, म्हणाली, "काही लोकांनी..."

लोकप्रिय अभिनेत्री वीणा जगतापनं मालिकांमधून आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. तिने तिच्या गोड हसण्याच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तरतिने अभिनय सोडून मेकअप आर्टिस्टचं शिक्षणही घेतलं. गेल्या काही काळात ती अभिनय क्षेत्रापासून काही काळ लांब होती. त्यामुळे तिने ब्रेक घेतला की काय? अशा चर्चा रंगताना दिसल्या होत्या. अशातच वीणाने कलर्स मराठीवरील ‘रमा माधव’ या मालिकेत एंट्री घेतली आहे.

कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘रमा राघव’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मालिकेत रमा राघवचा वनवास सुरु झाला असून त्यात विक्रम या असुराचा प्रवेश या पार्श्वभूमीवर वीणाचं एक नवं पात्र मालिकेत प्रवेश करत आहे. या मालिकेआधी वीणा ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाली होती. यावेळी वीणा ‘बिग बॉस’च्या घरातील काही सदस्यांसह तिच्या काही चाहत्यांची आवडती तर काहींची नावडती होती. याबद्दल वीणाने ‘इट्स मज्जा’शी साधलेल्या संवादात भाष्य केले आहे.

आणखी वाचा – Video : सुलेखा तळवलकरांनी खरेदी केली महागडी कार, लेकाला मिठी मारत भावना अनावर, पूजाही केली अन्…; व्हिडीओ व्हायरल

यावेळी वीणाने असं म्हटलं की, “मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. अशा परिस्थितीत मी संघर्ष करत आज जिथपर्यंत पोहोचली आहे. ते फक्त देवामुळे व माझ्या प्रेक्षकांमुळे शक्य झालं आहे. त्यांनी ‘राधा प्रेम रंगी रंगली’मधील माझ्या राधा या भूमिकेला स्वीकारलं किंवा ‘बिग बॉस’मध्येही काही लोकांना मी आवडले. काहींना मी नाही आवडले. पण ८०% लोकांना मला स्वीकारलं. मी ज्या ज्या ठिकाणी चुकले तिथे त्यांनी मला सुधारलं. मी आता जे कुणी आहे ते प्रेक्षकांमुळे आहे. त्यामुळे आताही माझ्या नकारात्मक भूमिका असली तरी ते मला स्वीकारतील अशी आशा आहे.”

आणखी वाचा – “गडकिल्ल्यावर बाई कधीच नाचली नाही”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “जाहीर निषेध कारण…”

दरम्यान, ‘कलर्स मराठी’वरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतून वीणाने टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी’मुळे वीणा अधिक प्रसिद्ध झोतात आली. आता पुन्हा एकदा वीणा ‘कलर्स मराठी’च्या प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Tags: marathi entertainment newsrama raghavveena jagtap
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
22 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष, तूळ व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार शुभवार्ता, तुमच्यासाठी बुधवार कसा असणार? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.