गौतमी पाटील या नावाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सध्या सेलिब्रेटींच्या तुलनेत गौतमी पाटीलला प्रचंड मागणी असल्याचं दिसून येतं. सोशल मीडियासह प्रत्येक माध्यमात गौतमी ही चांगलीच चर्चेत असते. आपल्या डान्समुळे व डान्समधील हावभावामुळे गौतमीबद्दलच्या अनेक चर्चा होताना पाहायला मिळतात. आपल्या डान्सने चर्चेत राहणारी गौतमी सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते.
अशातच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र यामुळे तिला नेटकऱ्यांच्या संतापजनक कमेंट्सचाही सामना करावा लागत आहे. गौतमीने तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या एका डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे पोस्ट केला आहे आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. गौतमीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘आलं बाई दाजी माझं’ या गाण्यावर डान्स करताना दिसत असून तिच्याबरोबर इतर काही मुलीदेखील पारंपरिक मराठी पोशाखात या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ शूटिंगचा असल्याचं दिसत आहे. गौतमीने काही दिवसांपूर्वी तिच्या उत्कर्ष शिंदेबरोबरच्या एका गाण्याची घोषणा केली होती आणि हा व्हिडीओ याच गाण्याच्या डान्सचा आहे. हे गाणं एका किल्ल्यात शूट करण्यात आल्याचं दिसत असल्यामुळे अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्सद्वारे टीका केली आहे. गौतमीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये किल्ल्याचा भाग दिसत असल्याने किल्ल्यावर शूट केल्यावरून अनेकांनी टिका केली आहे.

आणखी वाचा – यामी गौतमने चिमुकल्याला दिला जन्म, मुलाचं नावंही ठेवलं आहे फारस खास, नावाचा अर्थ आहे…
या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी “मला महित आहे तुम्ही जे काही करत आहात ती तुमची कला आहे, पण गड किल्ल्यांवर असे डान्स शूटिंग नका करु”, “पण छत्रपती शिवाजी महाराजांची थोडीशी तरी इज्जत ठेवा”, “ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत, हे गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्राची शान आहेत”, “गडकिल्यावर कधी बाई नाचली नाही तुमचा हा नाच्या कार्यक्रम पायथ्याशी दाखवा”, “गड किल्ल्यांवर अशी गाणी करणे अयोग्य आहे. दुसरी ठिकाणं मिळाली नाही का?”, “गडकिल्ल्यावर जाण्या इतकी लायकी नाही तुमची आणि तिथे डान्स काम करताय यांचा जाहीर निषेध” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी आपला संताप दर्शवला आहे.
दरम्यान, गौतमीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक टिकात्मक व संतापजनक कमेंट्स करत तिच्या या डान्सचा निषेध केला आहे. त्यामुळे गौतमीने शेअर केलेल्या या डान्स व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला हा किल्ला नेमका किल्ला आहे की सेट? याबद्दल अजून काही माहिती समोर आलेली नाही.