झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेने नुकतीच सात वर्षांची लीप घेतल्याने मालिकेच्या कथानकाला एक वेगळेच वळण आले आहे. या नवीन कथानकात अप्पी व अर्जुन यांचा मुलगा अमोल याचीही एंट्रीही झाली आहे. त्यामुळे अप्पी व अमोलची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडत आहे. मात्र या लीपमुळे अमोल व अर्जुन यांची ताटातुट झाली असून अर्जुन व अमोल कधी एकत्र येणार आहे याची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.
अमोल व अर्जुन एकमेकांना भेटत असले तरी दोघांपैकी कुणालाच त्यांच्या नात्याविषयी माहिती नाही. सात वर्षांपूर्वी अर्जुनने अप्पीला न भेटण्याचे व त्याच्याविषयी अमोलला माहीत न पडू देण्याचे वचन दिले होते आणि तेच वचन अप्पी आता पाळत आहे. मात्र अमोल व अर्जुन यांची भेट कधी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि हा प्रोमो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अप्पी अर्जुनच्या घरी त्याला भेटायला येते. मात्र अर्जुनची वाहिनी तिचा अपमान करते. या व्हिडीओमध्ये अप्पी रुपालीला वाहिनी म्हणून हाक मारते. मात्र रुपाली तिला ओळख न दाखवता “कोण आपण?” असा प्रश्न विचारते. यावर अप्पी “मी तुमची अपर्णा” असं म्हणते तिची ओळख सांगते. मात्र रुपाली तिचा अपमान करत “आमची अपर्णा आमच्यासाठी मेली” असं म्हणते.
यापुढे अप्पी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र रुपाली तिला आली आहेस तशीच परत जा, आपला काहीही संबंध नाही” असा म्हणत तिला जायला सांगते. यावर अप्पी अमोलविषयी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र रुपाली अप्पीच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि “आता कुठे भाऊजी सावरत आहेत. त्यामुळे तू त्याच्या आयुष्यात पुन्हा येऊम त्याचं आयुष्य बरबाद करू नको” असं म्हणते.
दरम्यान, या नवीन प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे मालिकेत आता अर्जुन, अप्पी व अमोल हे तिघे एकत्र येणार का? अप्पी-अर्जुन यांच्या नात्यातला कडूपणा कमी होणार? की आणखी वाढणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.