स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. मालिकेतील रंजक कथानक, कलाकारांचा सकस अभिनय प्रेक्षकांना या मालिकेकडे आकर्षित करत आहे. मालिकेत सध्या सायली-अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे कथानक सुरू असून हे नाईन कथानक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहे. मालिकेत नुकताच सायली-अर्जुन यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबीय खास सेलिब्रेशन करतानाचे पाहायला मिळाले.
एकीकडे घरातील सगळे सायली-अर्जुन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करत आहेत, तर दुसरीकडे सायली-अर्जुन यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही संपणार आहे. पण एकीकडे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपत असताना दुसरीकडे सायली-अर्जुन त्यांच्या नकळत एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पण दोघांनाही याबद्दल कल्पना नाही. त्यामुळे ते दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र मधुभाऊ सुटेपर्यंत आपला कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तसंच राहू देऊयात असं अर्जुन सायलीला म्हणतो. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या नवीन प्रोमोमध्ये सायली कुसुमकडे तिला अर्जुनविषयी वाटत असलेल्या प्रेमाविषयी तिची भावना व्यक्त करते. यावेळी कुसुम सायलीला असं म्हणते की, “सायली मि तुला आधीच सांगितलं होतं की तू या माणसांमध्ये गुतून जाऊ नको. तुझ्या स्वभावामुळे तू अर्जुन व त्यांच्या कुटुंबाच्या माणसांमध्ये गुंतून गेली आहेस.” यावर सायली तिला असं म्हणते की, “मी यांच्यात माझ्या स्वभावामुळे नाही तर अर्जुनच्या स्वभावामुळे अडकली आहे”.
यापुढे ती असं म्हणते की, “कुसुंटाई माझ्यासमोर कुठलीही अडचण आली तरी ते माझ्यामागे ठाम उभे राहतात आणि माझी काळजी घेतात. इतके दिवस आम्ही या खोलीत राहत आहोत पण त्यांनी कधी कुठली मर्यादा ओलांडली नाही. मला अवघडल्यासारखे वाटेल असंही वागले नाही ते कधी. त्यांनी दूर राहून माझी नेहमीच काळजी घेतली. त्यांनी हे सगळं केलं कारण ते एक माणूस म्हणूण् खूप चांगले आहेत. कुसुमताई मी एकतर्फी प्रेम केलं आहे आणि ते तसंच राहणार आहे.”
दरम्यान, या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे काय होणार? सायली-अर्जुन एकत्र येणार? की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजनुसार दोघे वेगळे होणार? की दोघेही त्यांचे प्रेम एकमेकांसमोर व्यक्त करणार? हे पाहण्यासाठी मालिकेचे प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.