प्रसिद्ध गायिका सुचित्रा रामादुराई संध्या तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे अधिक चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने साऊथ सुपरस्टार धनुष व पत्नी ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल धक्कादायाक खुलासा केला होता. त्या दोघांनी एकमेकांची फसवणूक केली होती. लग्न झाल्यानंतरही दोघांचे बाहेर प्रेमसंबंध होते असे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. तिने आता थेट बॉलिवूडच्या नामवंत कलाकारांवर निशाणा साधला आहे. तिच्या पतीसहित तिने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान व सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर यांच्या नात्यावर बोलली आहे. (suchitra on shahrukh khan and karan johar)
सुचित्राने त्याचा पूर्वाश्रमीचा पती कार्तिक कुमार, शाहरुख व करण हे समलैंगिक असल्याचे सांगितले आहे. सुचित्राने एका मुलाखतीमध्ये या सगळ्याचा खुलासा केला आहे. तिच्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने सांगितले की, “एकदा कार्तिकबरोबर मी लंडन ट्रीपला गेले होते तेव्हा तिथे करण व शाहरुख यांच्याबरोबर भेट झाली होती. आम्ही तेथे फिरलो. तिथे त्यांचे कपडे बऱ्यापैकी एकसारखेच होते. ते असे कपडे घालून गे एरियामध्ये जात असत. ते त्या वातावरणात पूर्णपणे मिसळत आणि रात्रीची मजा घेत असत”.
"My Ex husband, SRK and Karan Johar had gay encounter in London. SRK and Karan Usually go to the countries on holiday where gay encounters are legel" – Tamil singer Suchitra pic.twitter.com/SkPp8SCdWm
— MASS (@Freak4Salman) May 16, 2024
सुचित्राने पुढे सांगितले की, “कार्तिकदेखील समलैंगिक होता. तसेच लंडनमध्ये त्याचे शाहरुख व करणबरोबर शारीरिक संबंधदेखील झाले होते. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे परदेशात म्हणजे जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता आहे अशा देशात जाऊन असे संबंध ठेवतात”.
दरम्यान सुचित्राचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार्तिकने प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी जर समलैंगिक असतो तर मी अभिमानाने या सगळ्याचा स्वीकार केला असता. मला बिलकुल लाज वाटली नसती. मला अशा कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अभिमानच वाटला असता.
दरम्यान सुचित्राने शाहरुख व करण यांच्यावर खूप टोकाचे आरोप केले आहेत. त्यामुळे आता दोघांकडून कोणती प्रतिक्रिया येणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.