शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरी परतल्यानंतर ‘तारक मेहता…’ फेम सोढीचा पहिला फोटो समोर, अशी झाली आहे अवस्था, ओळखणंही कठीण, वडील म्हणाले, “त्याचे अपहरण…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 18, 2024 | 2:22 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tarak Mehta Ka Ooltah Chashma fame Gurucharan Singh of is back home and his first picture is also out

घरी परतल्यानंतर 'तारक मेहता...' फेम सोढीचा पहिला फोटो समोर, अशी झाली आहे अवस्था, ओळखणंही कठीण, वडील म्हणाले, "त्याचे अपहरण..."

‘तारका मेहता का उल्टा चश्मा’ फेम अभिनेता गुरुचरण सिंह अचानक गायब झाल्याचे वृत्त येताच त्याच्या अनेक चाहत्यांसह कुटुंबीयदेखील चिंतेत पडले होते. अशातच आता २२ एप्रिलपासून बेपत्ता असलेला गुरचरण सिंह २५ दिवसांनी घरी परतला आहे आणि अभिनेत्याचा पहिला फोटोदेखील समोर आला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्याबरोबर गुरुचरणचा फोटो एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे. या फोटोमध्ये गुरुचरण सिंह पोलिस कर्मचाऱ्याच्या शेजारी उभे राहून असतानाचे पाहायला मिळत आहे.

गुरुचरण घरी परतल्यानंतर लगेचच, दिल्ली पोलिसांनी अभिनेत्याची चौकशी केली आणि स्थानिक न्यायालयात त्याचा जबाब नोंदवला आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्याने तो एका आध्यात्मिक प्रवासासाठी घराबाहेर पडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. यापुढे पोलिसांनी असं म्हटलं की, “अभिनेत्याचे वडील हरजीत सिंग सुरुवातीला आमच्याशी बोलायला तयार नव्हते. पण नंतर त्यांना त्यांच्या मुलाबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, घरी येऊन दोन दिवस झाले आहेत”.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Gurucharan Singh has returned home on 17 May. He had gone missing on 22nd April. The Police have recorded his statement in the court. Gurucharan Singh said he had gone away from home on a spiritual journey: Delhi Police

(Pic source:… https://t.co/58EpY0ENVk pic.twitter.com/0YW3z9gWue

— ANI (@ANI) May 18, 2024

आणखी वाचा – इंद्राणीला रुपालीने केलं किडनॅप, तिच्याच रक्ताने नेत्राला पाठवलं पत्र, तन्मय फाशी घेत असताना अद्वैतने बघितलं अन्…; मृत्यूचा थरार

गुरुचरण घरी परतल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्यांचीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते असं म्हणाले की, “आता त्यांची प्रकृती ठीक आहे. तो आध्यात्मिक प्रवासासाठी घराबाहेर पडला होता. त्याचे अपहरण झाले नव्हते. आम्ही पोलिसांना सर्व काही सांगितले आहे.”

आणखी वाचा – “ज्यांची लायकी नाही त्यांनी…”, ट्रोल करणाऱ्यांना आनंद इंगळेंचं सणसणीत उत्तर, म्हणाले, “माझ्यावर त्यांनी का बोलावं?”

दरम्यान, एप्रिलच्या सुरुवातीला, गुरुचरण सिंह यांच्या वडिलांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती, ज्यात त्यांचा मुलगा मुंबईला आल्यानंतर अचानक बेपत्ता झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, गुरुचरण सिंह मुंबईला जाणे अपेक्षित होते. पण तो मुंबईत पोहोचला नव्हता. त्यानंतर प्राथमिक तपासादरम्यान, पोलिसांना असेही आढळून आले की, अभिनेता अनेक बँक खाती चालवत होता. अशातच आता त्यांचा पत्ता लागला आहे.

Tags: marathi entertainment newsTarak Mehta Ka Ooltah ChashmaTarak Mehta Ka Ooltah Chashma Fame Gurucharan Singh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Hruta Durgule's mother-in-law wished Hruta and Prateek Shah on their second wedding anniversary.

सासूबाईंचं हृता दुर्गुळेवर आहे जीवापाड प्रेम, सून व लेकाचा रोमॅंटिक व्हिडीओ पाहून म्हणाल्या, “तुम्ही दोघं...”   

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.