टीव्ही अभिनेत्री पवित्रा जयराम यांच्या निधनानंतर साऊथ टीव्ही विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. एका टेलिव्हिजन अभिनेत्याने आत्महत्या केली असल्याचं समोर आलं आहे. चंद्रकांतची ‘त्रिनयणी’ मालिकेतील सहकलाकार पवित्रा जयरामला हैदराबादमध्ये झालेल्या एका भीषण कार अपघातात जीव गमवावा लागल्याच समोर आलं. त्यानंतर दाक्षिणात्य अभिनेता चंदू हा त्याच्या मनीकोंडा येथील घरी संशयास्पद अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. तेलुगू अभिनेता चंदूच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांना व मनोरंजन क्षेत्रातील लोकांना मोठा धक्का बसला आहे. (Actor Chandu Commit Sucide)
अभिनेता चंदू उर्फ चंद्रकांत हा त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रसिद्ध होता. टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत चंदूचा समावेश होता. इतकंच नाही तर साऊथमध्ये त्याचा खूप मोठा चाहतावर्ग होता. अभिनेता चंदूने त्याची मैत्रीण पवित्रा हिचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर काही दिवसांनी आत्महत्या केली. रंगारेड्डी जिल्ह्यातील नरसिम्हा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अलकापूर येथील घरात चंद्रकांतचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला.
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, जेव्हा चंदूने वारंवार फोन करुनही प्रतिसाद दिला नाही तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा तोडला. एवढेच नाही तर पोलिसांना अभिनेत्याची सुसाईड नोटही सापडली आहे. चंद्रकांतच्या आत्महत्येच्या काही दिवस आधी पवित्रा जयराम यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता, त्यानंतर त्यांनी पवित्रा यांना त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर श्रद्धांजली वाहिली होती. आता या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून सोशल मीडियावर सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
पवित्राने तेलुगू शो ‘त्रिनयणी’मध्ये तिलोत्तमाची भूमिका साकारली होती. तर चंदूने तिचा पती विशालची भूमिका साकारली होती. याशिवाय त्याने ‘जोकली’, ‘नीली’, ‘राधा रमन’ इत्यादी शोमध्येही काम केले आहे.