बॉलिवूड सिनेसृष्टीतील आई-मुलीच्या जोड्या या नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडमधील अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तिची लेक आराध्या बच्चन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही मायलेकींनी जोडी एकत्र स्पॉट होतानाही दिसते. नुकतीच ऐश्वर्या व आराध्या यांनी ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. कान्स फिल्म्स फेस्टिव्हलला जाताना ऐश्वर्या व आराध्य स्पॉट झाली तेव्हा ऐश्वर्याच्या हाताला दुखापत झाली असल्याचं दिसून आलं. अभिनेत्रीच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याच्या चर्चा आहेत. यावेळी अभिनेत्रीने इतर कलाकारांसह तिचे ग्लॅमर मात्र कमी होऊ दिले नाही. (Aaradhya Bachchan Supports Aishwarya Rai)
कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्या रेड कार्पेटवर काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली. दुखापतीनंतरही ग्लॅमर दाखवत ऐश्वर्याने रेड कार्पेटवर फॅशन करत साऱ्यांची मनं जिंकली. पण या सगळ्यात तिची मुलगी आराध्या बच्चनचीही खूप चर्चा होत आहे. या कार्यक्रमातील आराध्याचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर आला आहे. आराध्याचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर लोक आराध्या बच्चनचे भरभरुन कौतुक करत आहेत. आराध्याकडे बघून नेटकरी म्हणत आहेत की, किती चांगले संस्कार मिळाले आहेत. १२ वर्षांची आराध्या तिची आई ऐश्वर्याला सपोर्ट करताना दिसत आहे. त्यांचा मायलेकींचा प्रेमाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१२ वर्षांची मुलगी तिच्या आईला रेड कार्पेटवर पोहोचण्यासाठी मदत करण्यासाठी पुढे आली. यावेळी ऐश्वर्या स्टायलिश काळ्या ट्रॅकसूटमध्ये दिसली. यावेळी आराध्या तिच्या आईच्या जवळ राहत तिची काळजी घेताना दिसली. ऐश्वर्याचा हात धरून हॉटेलमधून त्यांच्या कारपर्यंतही नेताना दिसली. एका नेटकऱ्याने कमेंट केली की, “विश्वास बसत नाही की ती १२ वर्षांची आहे”, तर एकाने, “बच्चन कुटुंबाची मूल्ये पाळत असल्याचं म्हटलं”.
कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आराध्याने तिच्या आईचा हात धरला आणि तिच्याबरोबर रेड कार्पेटपर्यंत चालत गेली. गाऊनमध्ये ऐश्वर्याला मदत करण्यासाठी आराध्याशिवाय ४ लोकांची टीम तैनात करण्यात आली होती. या वर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक भारतीय सेलिब्रिटींमध्ये ऐश्वर्याचा समावेश आहे.