बॉलिवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहतो. अभिनय क्षेत्राबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही इम्रानने अगदी स्पष्टपणे अनेक मुलाखतींमध्ये सांगितल्या आहेत. अलीकडेच इम्रानने तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याचं सांगितलं होतं आणि आता त्याच्या गर्लफ्रेंड लेखाने त्यांचं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. लेखाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे पहिल्यांदाच त्यांच्या दोघांचा एकत्र फोटो शेअर केला आहे.
एका समुद्राच्या किनारी दोघंही एकमेकांकडे बघत रोमॅंटिक पोज देत उभे असतानाचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोमध्ये दोघांचा चेहरा दिसत नसला तरी यात ते सहजरित्या ओळखले जात आहेत. जवळून मिठी मारताना ते एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहत आहेत. दोघांनी त्यांचे नाते अधिकृत जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर या जोडप्याने त्यांची ही पहिली पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा – शुक्रवारी मेष व मकरसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या…
लेखाविषयी बोलताना इम्रानने ‘हिंदुस्तान टाईम्स’ला असं म्हटलं होतं की, “माझ्या आयुष्यात एक व्यक्ती म्हणून लेखाचा खूप सकारात्मक आणि निरोगी प्रभाव राहिला आहे. ती खूप काळजी घेणारी, आधार देणारी आणि प्रेम करणारी आहे. तिने माझी खूप मदत केली आहे. जेव्हा मी नैराश्याच्या विळख्यात अडकलो होतो आणि स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तिने मला खूप सपोर्ट केला. जर ती नसती तर मी हा प्रवास कसा करू शकलो असतो हे मलाच माहीत नाही.”
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’नंतर ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, प्रोमो समोर
इम्रान खान नुकताच आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नात सहभागी झाला होता. तसेच याआधी त्याने अवंतिकाबरोबरच्या नात्याबद्दल कुठेही सांगितले नव्हते. अशातच काही दिवसांपूर्वी त्याने पाहिल्यांदाच अवंतिकाबरोबरच्या घटस्फोटाबद्दल व लेखा वॉशिंग्टनबरोबरच्या रिलेशनबद्दल उघडपणे भाष्य केले आहे. दरम्यान, इम्रानने यापूर्वी २०११ मध्ये अवंतिका मलिकबरोबर लग्न केलं होतं, परंतु काही कारणास्तव २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोघांना इमारा नावाची एक मुलगीदेखील आहे.