रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुंबई दौऱ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, नमस्कारही केला अन्…; म्हणाला, “आयुष्यतला हा क्षण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 16, 2024 | 4:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sushant Shelar Meet PM

मुंबई दौऱ्यामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला, नमस्कारही केला अन्…; म्हणाला, "आयुष्यतला हा क्षण..."

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चार टप्प्यांमधील मतदान पार पडलं आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. या रोडशोदरम्यान मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रचंड अशी गर्दी पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान बघायला मिळाली. यावेळी महिला, वृद्ध व लहान मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. (Sushant Shelar Meet PM)

या रोडशोनंतर पंतप्रधान मोदींनी मुंबईतील जनतेचे आभार मानले. तसेच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नतील मुंबई घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील ईशान्य मुंबईतील या रोडशोमध्ये मोदींनी भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढविला. यावेळी मराठमोळा अभिनेता सुशांत शेलारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. या खास भेटीचा फोटो व व्हिडीओ सुशांतने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

आणखी वाचा – अप्पीने बनवलेल्या जेवणाची चव सात वर्षांनी अर्जुन ओळखणार का?, अमोल मुलगा असल्याचं सत्य लवकरच समोर येणार

View this post on Instagram

A post shared by Sushant Shelar (@theshelar)

सुशांत शेलारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पंतप्रधानांच्या भेटीदरम्यानचे फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यावेळी त्याने ही पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “आयुष्यातला मौल्यवान क्षण. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी साहेब यांची भेट. हे शक्य झालं माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे”. या भेटीमुळे त्याने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. पंतप्रधानांच्या भेटीमुळे तो भारवला असल्याचंही पाहायला मिळालं.

आणखी वाचा – ‘ठाकरे’ घराण्यातील ‘ही’ व्यक्ती राजकारणात नव्हे तर चित्रपट क्षेत्रात करणार एंट्री, लवकरच मोठ्या चित्रपटाची घोषणा करणार

सुशांत शेलार काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय आहे. शिवसेना शिंदे गटमध्ये सुशांत सध्या कार्यरत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तो बरेचदा प्रसारमाध्यमांमध्येही दिसला आहे. सोशल मीडियावरही तो राजकारणाशी संबंधित अनेक पोस्ट शेअर करताना दिसतो. सुशांतने आजवर अनेक मराठी मालिका व चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

Tags: pm narendra modisushant shelarSushant Shelar Meet PMsushant shelar on politics
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ott release movie

‘जरा हटके जरा बचके’, ‘गॉडजिला एक्स काँग : द न्यू एम्पायर’सहित अनेक चित्रपटांची ओटीटीवर मेजवानी, कुठे आणि कधी पाहता येणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.