रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठाकरे’ घराण्यातील ‘ही’ व्यक्ती राजकारणात नव्हे तर चित्रपट क्षेत्रात करणार एंट्री, लवकरच मोठ्या चित्रपटाची  घोषणा करणार

Saurabh Moreby Saurabh More
मे 16, 2024 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Balasaheb Thackeray's grandson Aishwarya will make his debut in the entertainment industry

‘ठाकरे’ घराण्यातील ‘ही’ व्यक्ती राजकारणात नव्हे तर चित्रपट क्षेत्रात करणार एंट्री, लवकरच मोठ्या चित्रपटाची घोषणा करणार

‘ठाकरे’, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सक्रिय नाव, प्रबोधन ठाकरे यांच्याकडून लोकसेवेचा व जनहिताचा वसा घेत बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात सक्रिय असलेले ‘ठाकरे’ घराणे आजही राजकारणात तितकेच सक्रिय आहे. बाळासाहेबांच्याच बरोबरीने राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवले आणि त्यांच्याच शिकवणीत आता अमित व आदित्य ठाकरे ही तिसरी पिढीदेखील राजकारणात आहे.

पण ‘ठाकरे’ घराण्यातील एक मुलगा असाही आहे, ज्याला राजकारणात अजिबात रस नाही. सभेत भाषण करण्याऐवजी त्याला ७० मिमीच्या मोठ्या स्क्रीनद्वारे त्याला प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायचे आहे आणि तो म्हणजे स्मिता ठाकरे यांचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे. त्याला राजकारणात अजिबातच रस नाही.  त्यामुळे ठाकरे घराण्यातील ऐश्वर्यने राजकारणात जाण्याचा मार्ग न अवलंबता मनोरंजनाच्या क्षेत्रात आपली वेगळी वाट निवडली आहे.  

View this post on Instagram

A post shared by Aaishvary Thackeray (@aaishvarythackeray)

ऐश्वर्यने चित्रपटांच्या सेटवर ५-५ वर्षे घालवली आहेत. त्याने सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्याला चित्रपट, संगीत आणि कला यांमध्ये प्रचंड रुची असून गेली १५ वर्षे तो चित्रपट समजून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपट प्रदर्शनाविषयी अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत.

आणखी वाचा – अधिपतीही सरगम मॅडमच्या प्रेमाच्या जाळ्यात फसणार का?, अक्षराचा संसार मोडण्यासाठी भुवनेश्वरीचे जोरदार प्रयत्न, प्रेम बहरणार का?

‘एबीपी’ला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्य ठाकरे आता लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. येत्या काही महिन्यात याबाबतची एक मोठी घोषणा होऊ शकते. काही मोठे निर्माते ऐश्वर्यबरोबरच्या चित्रपटाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऐश्वर्यचे दणक्यात लाँचिंग करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आणखी वाचा – रजनीकांत यांच्या लेकीचा मोडला संसार, लग्नानंतरही दोघांचंही दुसऱ्या व्यक्तीबरोबर सुरु होतं अफेअर, बारमध्ये जायचे अन्…

दरम्यान, ऐश्वर्यची आई स्मिता ठाकरे या स्वत: चित्रपट निर्मात्या आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. पण, ठाकरे कुटुंबातील व्यक्तीने थेट चित्रपटात अभिनेता म्हणून काम केले नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही चित्रपटांसाठी आपला आवाज दिला आहे. मात्र, अभिनयापासून लांब राहिले. त्यामुळे आता ऐश्वर्यबाबत ही मोठी घोषणा कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Tags: Aishwarya ThackerayAishwarya Thackeray Marathi NewsBalasaheb Thackeray GrandsonSmita Thackeray Son
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Tanvi Azmi On Wedding

"ब्राह्मण असून मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यामुळे…", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने लग्नानंतरची सांगितली सत्य परिस्थिती, म्हणाल्या, "लग्नानंतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.