‘मेट गाला’नंतर आता ‘कान फेस्टिवल’ चर्चेत आला आहे. जगभरातील अनेक कलाकार या सोहळ्यासाठी हजेरी लावतात. वेगवेगळ्या तऱ्हेचे ड्रेस कलाकार परिधान करतात. या ड्रेसची चर्चादेखील मोठ्या प्रमाणात होताना दिसते. यावर्षी कान्स फेस्टिव्हलसाठी भारतातील ऐश्वर्या राय, कियारा आडवाणी सहित अनेक कलाकार हजर झाले आहेत. याआधीही या कलाकारांनी कान फेस्टिव्हलमध्ये आपल्या अदांनी घायाळ केले आहे. पण यावेळी कोणी अभिनेता-अभिनेत्री नाही तर एका वेगळ्या कारणामुळे कान फेस्टिव्हलची चर्चा होत आहे. प्रकरण नक्की काय आहे हे जाणून घेऊया. (cannes festival dog entry)
बॉलिवूड, हॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आतापर्यंत कान फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. यावर्षीदेखील या फेस्टिव्हलमध्ये कलाकार हिस्सा घेतात. पण यावेळी अशा एका कलाकाराने हजेरी लावली ज्यामुळे इतिहासात एक नवीन नोंद झाली आहे. पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर एका श्वानाने एंट्री केली. श्वानाच्या एंट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Un can en Cannes.
— Carla ❁ (@shannonlada) May 15, 2024
Te queremos, Messi 🐶❤️#Cannes2024pic.twitter.com/pxsClJOzYK
रेड कार्पेटवर आलेल्या श्वानाचे नाव मेस्सी आहे. मेस्सी ऑस्कर विनर चित्रपट ‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच त्याने एक कलाकार म्हणून कान्स फेस्टिव्हलसाठीही हजेरी लावली. श्वाना रेड कार्पेट वॉक केले असून फोटोसाठी पोजही दिल्या आहेत. तसेच फ्रेंच रिवेराच्या कार्पेटवर वॉक करणारा पहिला श्वान अशी त्याची नोंद झाली आहे. श्वान जेव्हा पोज देत होता तेव्हा त्याने दोन पावलावर उभे राहून आपल्या पंजांनी गर्दीला अभिवादन केले. तसेच मेस्सी दातांमध्ये सेल्फी स्टिकही घेऊन आला. त्याच्याबरोबर ट्रेनर लॉरा मार्टिनादेखील होती.
‘ॲनाटॉमी ऑफ अ फॉल’ या चित्रपटाचा प्रीमियर मागील वर्षी कान्स फेस्टिव्हलमध्ये झाला होता. २०२३ साली मेस्सीला पाम डॉगचा किताब मिळाला होता. हा किताब पत्रकारांच्या फेस्टिव्हलमध्ये श्वानासाठी दिला जातो. मेस्सीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीदेखील अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, “सर्वात गोड रेड कार्पेट इव्हेंट”, दुसरा नेटकरी लिहितो की, “आतापर्यंतचा सर्वात बेस्ट रेड कार्पेट इव्हेंट”.
कान्स फेस्टिव्हल या वेळी २५ मे रोजी होणार आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, शोभिता धुलीपाला, अदिती राव हैदरी, कियारा आडवाणी, विराज गेहलानी, शरण हेगडे असे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत.