‘झी मराठी’वरील ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळणे पाहायला मिळतात. पारू, आदित्य, प्रीतम यांच्यावर काही गुंडांनी हल्ला केलेला असतो मात्र आदित्य आणि प्रीतम या गुंडांच्या तावडीतून सुखरूप सगळ्यांची सुटका करून पुढच्या प्रवासाला निघतात. त्यानंतर ते कंपनीच्या प्रमोशनसाठी वाखरवाडीला पोहोचतात तिकडे हरीश त्यांचं स्वागत करतो. हरीशने आधीच येऊन सगळी सोय केलेली असते आणि सांगतो की, गावकरी आता जमलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला यावं लागेल, असं म्हणून सगळेजण गावकऱ्यांना भेटायला येतात. (Paaru Serial Update)
तेव्हा गावकरी म्हणतात की, हे सुटा बुटातले लोक आहेत यांना काय मातीची जाण असणार आणि दिशानं घातलेले कपडे पाहून तर त्यांचा संतापच होतो त्यानंतर तिथून उठून सगळे गावकरी जायला निघतात तेव्हा पारू त्यांना अडवते आणि सांगते की, मला फक्त दोनच मिनिट द्या मी तुम्हाला याची खात्री पटवून देते. की ही माणसंही आपल्यासारखीच आहेत यांना कष्टाची जाणीव आहे. त्यानंतर ती प्रीतम आणि आदित्यला घेऊन जाते आणि त्यांना सांगते की तुम्हाला गावातल्या लोकांसारखाच राहावं लागेल, देश तसा वेश, असे म्हणून ती काही कपडे हरीशच्या मदतीने आदित्य व प्रीतमच्या हातात सोपवते.
त्यानंतर आदित्यला धोतर नेसता येत नाही तेव्हा पारू त्याला धोतर नेसायला मदत करते. पारू व गणी आदित्यला धोतर नेसवतात. हे पाहून दिशा म्हणते की, किर्लोस्कर कुटुंबाचा मालकाला ही इम्प्रेस करायला बघते असं म्हणत त्यांचा व्हिडिओ शूट करते आणि ती अहिल्यादेवींना पाठवते. तर इकडे अहिल्यादेवी मात्र श्रीकांतबरोबर बाहेर जाण्याच्या गडबडीत असतात म्हणून त्या काही तो व्हिडीओ पाहत नाही. तर इकडे आदित्य व प्रीतम सदरा, फेटा आणि धोतरमध्ये गावकऱ्यांसमोर येतात आणि त्यांना आपल्या प्रॉडक्टचे महत्व पटवून देतात. त्यानंतर पारू देखील चार शब्द सांगत आपल्या प्रॉडक्ट बद्दल गावकऱ्यांना खात्री पटवून देते तर आदित्य गावकऱ्यांबरोबर खाली बसून संवाद साधतो. यावेळी हरीशही गावकऱ्यांना प्रॉडक्टचे महत्व पटवून देताना दिसतो तेव्हा आदित्य पारूजवळ येतो आणि सांगतो की, हरीश किती मनमिळाऊ आहे ना, तो अगदी सगळ्यांशी पटकन जुळवून घेतो तेव्हा पारूच्या लक्षात येतं की हरीशसाठी यांनी माझं स्थळ आणले म्हणून हे मला असं सांगतात.
तेव्हा पारू सांगते की, मला लग्न वगैरे करायचं नाही. तेव्हा आदित्य म्हणतो मग तू काय एकटीच राहणार आहेस का?, तुझ्या देवी आईने हे स्थळ तुझ्यासाठी आणले म्हणजे काहीतरी विचारच केला असेल, असं म्हणत तो तिथून निघून जातो आणि जाता जाता सांगतो की, तू या गोष्टीचा नक्की विचार कर. आता आदित्यमुळे पारू लग्नाला होकार देणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.