‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. अनेक कलाकारांना या रिऍलिटी शोने एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या कार्यक्रमाने त्याच्या विनोदी शैलीने जगभरात प्रेक्षकांची मन जिंकली. इतकंच नव्हेतर कार्यक्रमातील कलाकारांनी ही प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. कार्यक्रमातील कलाकारांचा खूप मोठा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली कल्याणची चुलबुली अभिनेत्री शिवाली परब ही देखील नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. (Shivali Parab New Home)
सोशल मीडियावर ही शिवाली बऱ्यापैकी सक्रिय असते. काल शिवालीच्या वाढदिवसानिमित्त तिच्यावर अनेक चाहत्यांसह कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. अशातच शिवालीने काही दिवसांपूर्वीच नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती. शिवालीने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
यावेळी शिवालीच्या नव्या घराची झलक पाहायला मिळते. इतकंच नव्हेतर शिवालीच्या या नव्या घरात गृहप्रवेशादरम्यान तिने पूजाही केलेली पाहायला मिळते. यावेळी शिवालीचा पारंपरिक अंदाजही प्रेक्षकांना विशेष भावला. शिवानीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती आणि ती पूजेत मग्न झालेली पाहायला मिळाली. मनापासून अगदी पूजा करत शिवाली खूप आनंदात दिसत होती. याशिवाय यावेळी तिच्या जवळचे नातेवाईक व कुटुंबीय ही तिच्याबरोबर तिच्या या आनंदात सहभागी झाले होते.
अखेर शिवालीने तिच्या वाढदिवसानिमित्त नव्या घरात गृहप्रवेश केला असल्याचं पाहायला मिळत आहे. आता शिवाली तिच्या नव्या घराची पहिली झलक प्रेक्षकांना केव्हा दाखवणार याबद्दल तिच्या चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. @_youreflectioncanbeseen या इन्स्टाग्राम पेजवरून शिवालीच्या घरातील पूजेचा पहिला फोटो शेअर करण्यात आला आहे. एवढ्या कमी वयात स्वत:चं घर घेतल्यामुळे तिचं विशेष कौतुक केलं जात आहे.