मंगळवार, मे 20, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल…

Saurabh Moreby Saurabh More
मे 6, 2024 | 1:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Naach Ga Ghuma and Juna Furniture movies box office collections see the details

बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपटांची चर्चा, ‘जुनं फर्निचर’ व ‘नाच गं घुमा’ने आतापर्यंत किती कमावले?, एकूण कमाई तब्बल...

मराठी प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहांमध्ये मनोरंनाची मेजवानी असल्याची पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात अनेक दर्जेदार चित्रपट दाखल झाले आहेत. १ मे रोजी अभिनेत्री मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांचा ‘नाच गं घुमा’ प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्याबरोबर ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. या चित्रपटालादेखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. तर महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

Sacnilkच्या वृत्तानुसार महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ने पहिल्या दिवशी ३८ लाख, तर दुसऱ्या दिवशी ७२ लाख रुपयांची कमाई करत तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १ करोडचा टप्पा पार केला. त्यानंतर चौथ्या  व पाचव्या दिवशी अनुक्रमे ३५ व ४४ लाखांची कामी केली. यानंतर सहाव्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ७९ लाखांची मजल मारली. अशाप्रकारे ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची ६ दिवसांची एकूण कमाई ही ३.७ करोड इतकी आहे.

View this post on Instagram

A post shared by Panorama Studios (@panorama_studios)

आणखी वाचा – आयसीयूमध्ये भाऊ, गणपती बाप्पाला घरी आणलं अन्…; ‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीच्या आईचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाली, “बाबा नाहीत…”

तर परेश मोकाशी यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘नाच गं घुमा’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून सर्वच प्रसार माध्यमांमध्ये या चित्रपटाची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी ८० लाख, तिसऱ्या दिवशी ९५ लाखांची कमाई केली. तर गेल्या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच भर पडली. वीकेंडला या चित्रपटाने ३.९० कोटी कमावले असून पाच दिवसांची एकूण कमाई ही ५.७५ इतकी आहे.

आणखी वाचा – “सध्या मी भारतात नाही पण…’, परदेशात असलेल्या मुक्ता बर्वेला करमेना, भावुक होत म्हणाली, “पहिल्यांदाच असं झालं असेल…”

दरम्यान, नाच गं घुमा या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावसह सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने व मायरा वायकुळ यांच्यासह सारंग साठ्ये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर स्वप्नील जोशी व शर्मिष्ठा राऊत यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.     

Tags: Juna Furnituremarathi entertainment newsMarathi Movies Collection NewsNaach Ga Ghuma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Snehal Tarde on Pahalgam Attack
Entertainment

“भिकारड्या, पाकड्याचा राग आणि…”, पुण्यातील तिरंगा रॅलीमध्ये मराठी अभिनेत्रीचा सहभाग, म्हणाली, “दहशतवादी ठेचल्यामुळे…”

मे 20, 2025 | 11:41 am
Dipika Kakar tumor in liver
Entertainment

प्रचंड वेदना, टेनिस बॉलएवढा ट्युमर अन्…; बायकोची परिस्थिती सांगताना रडला शोएब इब्राहिम, दोन वर्षाच्या लेकाचे हाल

मे 20, 2025 | 11:37 am
Archana Puran Singh Mother
Entertainment

अर्चना पुरण सिंह यांची आई ९४व्या वर्षी करत आहे बॉक्सिंग, उत्साह पाहून नेटकरी, म्हणाले, “आजी सगळ्यांनाच मारणार…”

मे 20, 2025 | 11:02 am
Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
Next Post
rakesh bedi wife cyber fraud

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी यांच्याबरोबर मोठा फ्रॉड, पत्नी फोनवर बोलत असतानाच खात्यामधून लाखो रुपये गायब, नेमकं प्रकरण काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.