‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, चैतन्य समोर अर्जुन व सायली साक्षीचा खरा चेहरा आणतात. चैतन्यला जेव्हा समजत तेव्हा चैतन्य हा साखरपुडा मोडायला जातो मात्र सायली व अर्जुन चैतन्यला थांबवतात आणि सांगतात की, तु आता अशी काही घाई करु नको. आता ही संधी आहे, साक्षीकडून सगळं काही सत्य काढून घ्यायची. विलास खुनाचे पुरावे साक्षी कडून काढून घ्यायचे असतील तर ल तुम्हाला तिच्याशी साखरपुडा करावाच लागेल. आणि नाईलाजास्तव तिच्याबरोबर रहावं लागेल. तर इकडे साक्षी दरवाजा बाहेर उभी राहून चैतन्यला आवाज देत असते की, तू लवकर बाहेर ये. अजून आत काय करत आहेस?, यावर चैतन्य हो दोन मिनिटात दार उघडतो असं सांगतो. त्यानंतर चैतन्य साखरपुडा करायला तयार होतो. (Tharal Tar Mag Serial Update)
सायली मागच्या दरवाजाने निघून जाते तर अर्जुन व चैतन्य दरवाजा उघडतात. आणि ते साक्षीला काहीतरी कारण देत तिथून निघतात. त्यानंतर साक्षी व चैतन्य खाली येतात. साखरपुड्यासारखी पवित्र विधी या मुलीबरोबर करण्याची चैतन्यची जराही इच्छा नसते, मात्र तरीही तो तयार होतो. आणि एकमेकांना अंगठी घालत दोघांचाही साखरपुडा संपन्न होतो. त्यानंतर सुभेदार कुटुंब घरी येत आहे घडला सर्व प्रकार अर्जुन व घरातल्या मंडळींना सांगतो. त्याच वेळेला चैतन्य अर्जुनला फोन करतो किती दिवसांनी तरी चैतन्यचा अर्जुनला फोन आल्यानंतर तो भावुक होतो. त्यानंतर घरातली सगळीच मंडळी फोनवर बोलू लागतात. त्यानंतर चैतन्य सगळ्यांचे आभार मानतो. त्यानंतर इकडे साक्षी चैतन्यला शोधत शोधत येते आणि म्हणते की, तू इतका वेळ कुठे होतास मी तुला केव्हापासून शोधत आहे यावर चैतन्य म्हणतो की, मी अर्जुनच्या घरी फोन केलेला ते एवढे आपल्यासाठी इथे आले तर त्यांचे मी आभार मानले.
यावर साक्षी म्हणते हो. यावर चैतन्य म्हणतो की, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. यावर साक्षी उत्तर देत म्हणते की, माझ्यापेक्षा तरी जास्त नसेलच. मी आज खूप खुश आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारतात तेव्हा साक्षी मनातल्या मनात विचार करते की, मी आता तुझा वापर करून झाला की तुला सहज असं बाजूला करून टाकेन. त्यानंतर इकडे सायली व अर्जुन बोलत असतात तेव्हा अर्जुन सायलीचे आभार मानतो आणि सांगतो की, आम्हा दोन मित्रांना तुम्ही एकत्र आणलं आणि हे तुम्हीच करू शकला असता. यानंतर आता मालिकेच्या पुढील भागात सायली व अर्जुन बसलेले असतात. तेव्हा प्रताप अर्जुनच्या हातात सोन्याचा विडा देतो. तर पूर्णा आजी म्हणते, प्रताप हा सोन्याचा विडा तुला तुझ्या बाबांनी दिला होता ना?, यावर प्रताप म्हणतात की, हो हा मला माझ्या बाबांनी दिला होता आता यापुढे या घराची संपूर्ण जबाबदारी या दोघांची आहे त्यामुळे हा विडा मी त्यांना देत आहे.
मात्र पूर्णा आजी यावर नाराज असते कारण तिचं म्हणणं असतं की, तू खूप घाई करत आहेस, अजून थोडा वेळ जायला हवा असं म्हणत त्या तिथून निघून जातात आता नेमकं मालिकेत काय होणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.