‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील लोकप्रिय पात्र रोशन सिंग सोधी म्हणजेच गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन ६ दिवस झाले आहेत. २६ एप्रिल रोजी तो बेपत्ता झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे वडील हरगीत सिंग यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप हा तपास सुरु आहे. तपासादरम्यान त्याचे शेवटचे ठिकाण व एटीएममधून काही पैसे काढल्याची नवीन माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हेतर अभिनेता लग्नाच्या तयारीत असल्याचीही बातमी समोर आली आहे. (Gurucharan Singh Was About To Get Married)
अभिनेता गुरचरण सिंग बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. गुरुचरनला २२ एप्रिलला दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठी विमान पकडायचे होते, पण तो विमानतळाच्या दिशेने गेला नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, अभिनेता दिल्लीतील पालमसह इतर अनेक भागात पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसत आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिल रोजी गुरुचरण यांनी त्यांच्या घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या पालम, दिल्ली येथील एटीएममधूनही सुमारे ७ हजार रुपये काढले होते त्यानंतरच त्याचा फोन बंद झाला. म्हणजेच २४ एप्रिलपर्यंत अभिनेता दिल्लीत उपस्थित होता आणि त्यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला. २४ तारखेलाच तो पालम येथील घरापासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी उपस्थित होता, हे स्पष्ट झाले आहे.
आणखी वाचा – दिशाचा डाव फसला, पारूला शुद्ध आली, अहिल्यादेवींमुळे वाचला जीव, आदित्यला अश्रू अनावर अन्…
पोलीस तपासात समोर आलेल्या गोष्टींपैकी एकीकडे गुरुचरण सिंग लग्नाच्या तयारीत होता आणि दुसरीकडे तो आर्थिक संकटातूनही जात होता असं समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या फ्लाइटची वेळ रात्री ८:३० होती पण फोनवरील शेवटचे लोकेशन रात्री ९:१४ च्या सुमारास पालम हे होते. रिपोर्ट्सनुसार, गुरुचरण सिंह यांची आई बऱ्याच दिवसांपासून आजारी आहे. तिला काही काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि ती आता घरी आहे. यावेळी संपूर्ण कुटुंब गुरुचरणच्या चिंतेत आहे आणि अभिनेता लवकरच घरी परतेल अशी आशा आहे.
गुरुचरण सिंग २००८-२०१३ या काळात ‘तारक मेहता’ या शोचा भाग होता. निर्माते असित मोदी यांच्याबरोबर शोमध्ये झालेल्या वादांमुळे त्याने हा शो सोडला. तथापि, त्याच्या लोकप्रियतेमुळेव प्रेक्षकांच्या मागणीमुळे, निर्मात्यांनी त्याला शोमध्ये परत बोलावले परंतु २०२० मध्ये त्याने पुन्हा शो सोडला. वडिलांची काळजी घेण्यासाठी दुसऱ्यांदा गुरुचरणने शो सोडल्याचे बोलले जात आहे. गुरुचरण सिंग यांचे चाहते आणि त्याचे कुटुंबीय त्याच्या आरोग्यासाठी सतत प्रार्थना करत आहेत.