झी मराठीवरील काही दिया परदेस ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका आहे. या मालिकेने आणि या मालिकेतील प्रत्येक पात्राने चाहत्यांचे मन जिंकली होती. या मालिकेतील गौरी आणि शिवाची जोडीचा तर आजही एक वेगळा चाहता वर्ग असलेला पाहायला मिळतोय. अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री सायली संजीव या मालिकेत मुख्य भूमिकेत होते.या मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली असून तो घराघरात पोहचला.(Rishi Saxena)
मालिकेसोबतच त्याने पावनखिंड,फत्तेशिकस्त या ऐतिहासिक चित्रपटात भूमिका साकारून त्याने एक स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. सध्या ऋषी हा हिंदी मनोरंजन विश्वात पदार्पण करतोय.ही आनंदाची माहीती त्याने इंस्टाग्रामवर शेअर केली. कलर्स वाहिनीवरील सावी की सवारी या मालिकेत तो मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या मालिकेत ती मानव ही भूमिका साकारणार. अभिनेता ऋषी सक्सेना आणि अभिनेत्री समृद्धी शुक्ला यांच्यातील केमिस्ट्री या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेचा प्रोमो ऋषीने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर करताच अनेक चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला.तर आता ऋषी ही भूमिका सकारात्मक आहे की नकारात्मक हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
हे देखील वाचा – ट्रेडिंग गाण्यावर गरबा केल्याने रेश्मा शिंदे झाली ट्रोल
तसेच याआधी देखील मुविंग आउट मलिकेत त्याने अभिज्ञा भावासोबत स्क्रीन शेअर केली. लवकरच ऋषी सक्सेना रेनबो या मराठी चित्रपटातून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ऋषी आणि ईशा यांच्या नात्याची तर सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.ते दोघे नेहमी एकमेकांसोबतचे अनेक फोटो व्हिडीओ शेअर करत एकमेकांच्या कामाचं कौतुक देखील करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगते.४ वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये असून ते कधी लग्न करणार यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष लागलंय.(Rishi Saxena)
