गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आठवी अ’च्या भरघोस प्रतिसादाबरोबरच नव्या वेबसीरिजची घोषणा, ‘रस्त्यावरची शाळा’चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 24, 2024 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
its majja new web series rastyavarchi shala poster announced see the details

'आठवी अ'च्या भरघोस प्रतिसादाबरोबरच नव्या वेबसीरिजची घोषणा, 'रस्त्यावरची शाळा'चं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या वेबसीरिजचे चांगलेच प्रस्त वाढले आहे. अनेक ओटीटी माध्यमांवर अनेक प्रकारचे चित्रपट व सीरिज प्रदर्शित होत आहेत. याशिवाय युट्यूबद्वारेही अनेक सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशातच युट्यूबवर एका वेबसीरिजने सध्या अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोणताही ओळखीचा चेहरा न घेता केवळ कथानकाच्या आणि नवोदित कलाकारांच्या उत्तम अभिनयाने नटलेल्या या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे आणि ही लोकप्रिय वेबसीरिज म्हणजेच ‘आठवी अ’.

‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ आणि ‘इट्स मज्जा’ ओरिजनल नेहमीच प्रेक्षकांसाठी आशयघन व मनोरंजक गोष्टी प्रेक्षकांसाठी घेऊन येत असतात. यापैकीच ‘आठवी अ’ ही सीरिज आहे. या वेबसीरिजच्या भरघोस प्रतिसादाबरोबर आता ‘कोरी पाटी प्रॉडक्शन’ व ‘इट्स मज्जा’ चाहत्यांसाठी आणखी एक नवी वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे आणि या सीरिजचे नाव आहे ‘रस्त्यावरची शाळा’. गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर या सीरिजची घोषणा करण्यात आली होती आणि अशातच आता या सीरिजचे पोस्टरदेखील प्रदर्शित झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – “फोन बंद करुन बसलास म्हणून…”, चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सोडताच अवधूत गुप्तेची कमेंट, म्हणाला, “निर्णय शहाणपाचा आहे का हे…?”

गावखेड्यातील ऊसतोड कामगार, विटभट्टीवरील कामगार, रस्तेकामगार यासह ज्या मुलांची शाळेत जाण्याची आर्थिक स्थिती नाही. ज्या मुलांना काही कारणास्तव शाळेत जाता येत नाही. अशा मुलांसाठी रस्त्यावर शाळा उभारण्यात येते. त्या रस्त्यावरच्या शाळेत मुलांचे शिक्षण कसे पूर्ण होते?, त्यांना या शाळेत नेमके काय आणि कसे शिकवले जाते? यावर या सीरिजचे कथानक भाष्य करणार आहे.

आणखी वाचा – या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची पर्वणी, प्रेक्षकांना पाहता येणार हे लोकप्रिय चित्रपट व वेबसीरिज, पाहा संपूर्ण यादी

नुकतंच या सीरिजचे पोस्टर शेअर करण्यात आले असून हे पोस्टरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मीडिया वन सोल्यूशन्स प्रस्तुत, इट्स मज्जा ओरिजिनल व कोरी पाटी प्रॉडक्शन च्या ‘रस्त्यावरची शाळा’ या सीरिजचे दिग्दर्शक हे नितीन पवार आहेत. दरम्यान, ‘आठवी अ’ला मिळालेल्या भरभरुन प्रतिसादाबरोबर ‘रस्त्यावरची शाळा’ ही नवी कोरी वेबसीरिजही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे.      

Tags: its majjanew web seriesrastyavarchi shala
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

April May 99
Entertainment

‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता या दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

मे 15, 2025 | 1:05 pm
Kaafi Victim Of Asid Attack
Women

तीन वर्षांची असताना अ‍ॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के

मे 15, 2025 | 11:54 am
mithun chakraborty son namashi
Entertainment

“आडनावावरुन काम, टॅलेंट न बघताच…”, मिथुन चक्रवर्तींच्या लेकाचे बॉलिवूडवर गंभीर आरोप, म्हणाला, “वडिलांना बी-ग्रेड म्हणत…”

मे 15, 2025 | 11:48 am
Sunita Ahuja On Relationship
Entertainment

“सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”

मे 15, 2025 | 10:53 am
Next Post
Kranti redkar daughetr and husband video

Video : विमानाने उड्डाण घेताच घाबरली लेक, समीर वानखेडे समजूत काढू लागले अन्…; क्रांती रेडकरने शेअर केलेल्या व्हिडीओची जोरदार चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.