रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भारत सोडून जायला आम्ही इंग्रज नाही”, मुलाच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकरची पत्नी भडकली, म्हणाली, “हा निर्णय घेण्याचा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 23, 2024 | 9:27 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Chinmay Mandalekar Wife On Trolling

"भारत सोडून जायला आम्ही इंग्रज नाही", मुलाच्या नावावरुन ट्रोल करताच चिन्मय मांडलेकरची पत्नी भडकली, म्हणाली, "हा निर्णय घेण्याचा…"

अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आला आहे. मुलाच्या नावावरुन मांडलेकर कुटुंबियांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. हा मुद्दा सध्या विशेष चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. चिन्मय व त्याची पत्नी नेहा हिने त्यांच्या मुलाचे नाव जहांगीर असे ठेवल्याने त्यांना ट्रोल केलं जातं आहे. या प्रकरणावरून चिन्मयची पत्नी नेहा जोशी-मांडलेकर हिने सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला असल्याचं पाहायला मिळत आहे. (Chinmay Mandalekar Wife On Trolling)

नेहाने या आठ मिनिटाच्या व्हिडीओमध्ये ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत सुनावलं आहे. नेहा म्हणाली, “नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर. माझी जात आधी सांगते, कारण सध्या ती सगळ्यात महत्त्वाची आहे. माहेरकडून मी देशस्थ ब्राह्मण आहे. सासरकडून मी द्वेष्टा कासार आहे. मी हिंदू आहे. काही दिवसांपूर्वी माझे पती चिन्मय यांनी एका पॉडकास्टला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर आम्हाला खूप ट्रोल केलं जातं आहे. पण आम्हाला जे ट्रोल केलं जात आहे ते माझ्या पतीच्या कामावरुन नाही तर आमच्या मुलाच्या नावावरुन ट्रोल केलं जातं आहे.

आणखी वाचा – “मी मंगळसूत्र घालीन किंवा नाही घालणार”, मंगळसूत्रावरील चर्चांवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मांडलं मत, पोस्ट करत म्हणाली, “लग्न संस्कृती…”

लोकांना त्यांच्या मुलाचं नाव घेऊन त्याची चर्वणं करण्याचा हक्क नाहीय. मला लोकांना एक आठवण करुन घ्यायची आहे की, त्या मुलाला एक आईसुद्धा आहे, जी कलाकार नाही. त्या आईला आणि तिच्या मुलांना त्यांचं खासगी आयुष्य खासगी ठेवण्याचा पूर्ण हक्क आहे. हे सगळं त्याच्याविरोधात लिहिलं जातं आहे, जो फक्त एक दहा-अकरा वर्षांचा एक लहान मुलगा आहे. तो का ट्रोल होत आहे तर त्याचं नाव ‘जहांगीर’ असं आहे. जहांगीर नाव आम्ही कधी ठेवलं? आता सगळंच सांगते, खरंतर स्वतंत्र भारताची नागरिक म्हणून मी कुणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधील नाही पण मलाच असं वाटलं की, अज्ञानातलं हे ट्रोलिंग होत असेल तर माझी जबाबदारी आहे की हे अज्ञान दूर करावं.

तर माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे, जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे. माझ्या मुलाचा जन्म २१ मार्च २०१३ ला झाला. २१ मार्चला जमशेदी नवरोज होता. आणि त्यादिवशी तो जन्मला म्हणून त्याचं नाव जहांगीर. आता हे नाव कुणावरुन ठेवलं कसं ठेवलं हा मुद्दा नंतर येतो पण या नावाचा अर्थ खूप सुंदर आहे. जहांगीर म्हणजे जगज्जेता. जग जिंकलेला जहांगीर म्हणून हे नाव ठेवलं. मला माहित नाही इतर लोक त्यांच्या मुलांची नावं कशी ठेवतात पण मी तरी माझ्या दोन्ही मुलांची नावं ही त्या नावांचा अर्थ फार गोड आहे म्हणून ठेवलेली आहेत. एवढंच काय तर भारतरत्न जेआरडी टाटा यांचं नावही जहांगीरच आहे. टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी आहे. आता सुचवणारे असंही सुचवतात की जर जगजेत्ता या अर्थाचं नाव ठेवायचं असेल तर मग तुम्ही पृथ्वीराज का नाही ठेवलं? तुम्ही विक्रमादित्य का नाही ठेवलं? याही नावांचे अर्थ असे होतात. तर तो हक्क आम्हाला पालक म्हणून असावा नाही?, बरं दुःख काय आहे की आपण शतकानुशतकं मुस्लिम बांधवांबरोबर राहतो.

View this post on Instagram

A post shared by Neha Joshi Mandlekar (@nehachinmaymandlekar)

आणखी वाचा – विरोचकाने रुपालीला दिली एक अद्भूत शक्ती, राजाध्यक्ष कुटुंबियांवर मोठं संकट, नेत्रा-अद्वैत कसा करणार या संकटाचा सामना?

अगदी आपल्या आयुष्यातलं बघाल तर आपले सुपरस्टारदेखील मुसलमान आहेत, आपले क्रिकेटरदेखील मुसलमान आहेत. या सुपरस्टार्सच्या चित्रपटांना आपणच कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय मिळवून देतो. ते चालतं आणि माझ्या मुलाचं नाव सलतंय? म्हणजे माझ्या नवऱ्याने बिबट्या कराटेचं पात्र साकारलं की लगेच लोक म्हणाले की, “अरे बापरे रोल फारच सिरीयस घेतला मुलाचं मुस्लीम नाव ठेवलं”. खरंतर हे पात्र साकारायच्या आठ वर्षे आधी हे नाव ठेवलेलं होतं. मुलाचं नाव जहांगीर ठेवून आम्ही चूक नाही केली, तर तो हक्क आम्हाला आहे.

हो, पण मला हे एक कळलं की महाराजांवर, महाराजांच्या शिकवणींवर कितीही श्रद्धा असली, महाराजांवर कितीही प्रेम असलं, आमच्या घरात महाराजांच्या कितीही तस्विरी असल्या, रोजच्या बोलण्यात महाराजांचे कितीही दाखले आम्ही आमच्या मुलांना देत असलो तरी या देशात त्या अपुऱ्या आहेत. कारण या देशात त्यांचं नाव हक्काने घेण्याचे अधिकार आता सगळ्यांकडे नाहीत. आमच्याकडे ते नाहीत. आमच्याकडे त्यांचं नाव घेण्याचा, महाराजांचं पात्र स्क्रीनवर साकारण्याचा हक्क नाही तर यासाठी मी उभ्या महाराष्ट्राची माफी मागते की आम्ही आमच्या मुलाचं नाव जहांगीर असतानासुद्धा स्क्रीनवर महाराजांची भूमिका साकारण्याचं धाडस केलं, आम्हाला क्षमा करा, आमची चूक झाली. आम्हाला असं वाटलेलं की महाराज हे एका नटापेक्षा त्याच्या नावापेक्षा खूप मोठे आहेत. त्यांचं नाव, त्यांचं काम, त्यांचं चरित्र खूप मोठं आहे. आम्ही चुकलो आम्हाला हे लोकांपर्यंत पोहोचवता नाही आलं.

View this post on Instagram

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

आणखी वाचा – हनुमान जयंतीनिमित्त ‘या’ राशींचे नशीब उजळणार, हनुमानजींच्या आशीर्वादाने सर्व समस्यांचे निराकरण होणार, जाणून घ्या…

आज सकाळीच एका सद्गृहस्थांचं मला मेसेज आला की, हा देश सोडून तुम्ही अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानात जाऊन रहा. ते वाचून वाईट वाटलं. या देशातल्या एका व्यक्तीला मला माझ्या मुलाच्या नावावरुन हा देश सोडून जा असा सल्ला मला द्यावासा वाटला याचं मला वाईट वाटत आहे, आणि याची मला खंत आहे. परत कुणी मला असला सल्ला देऊ नये म्हणून हा व्हिडीओ शेअर करत आहे. मी भारतीय आहे, माझा नवरा भारतीय आहे, माझी दोन्ही मुलं भारतीय आहेत. जेआरडी टाटा भारतीय होते आणि आम्ही आमच्या भारतात आमच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय घेण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. या व्हिडीओनंतर ट्रोलिंग थांबणार आहे का?, अजिबात नाही. तर अर्थात दुपटीने वाढेल पण आता माझ्याकडून मी माझं काम केलं मी माझी भूमिका स्पष्ट केली”.

Tags: Chinmay Mandalekar On Trollingchinmay mandalekar trollChinmay Mandalekar Wife On Trollingentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
gautami deshpande support chinmay mandlekar

"लोकांची लायकी नाही आणि…", चिन्मय मांडलेकर प्रकरणावर गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, "कलाकाराला असं वागवणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.