‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, चेतना भट, रसिका वेंगुर्लेकर, वनिता खरात, गौरव मोरे, ओंकार राऊत, पृथ्विक प्रताप, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रभाकर मोरे, अरुण कदम, ईशा डेसारख्या अनेक कलाकारांनी या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या कलाकारांबरोबरच या शोमधील एकजण नावारुपाला आला तो म्हणजे या शोचा संगीत संयोजक अमीत हडकर.
अमीरने आजवर अनेक लाईव्ह शोमध्ये वादकाचे व संगीत संयोजनाचे काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. हास्यजत्रामधील अनेक स्किट्सद्वारेही त्याच्या नावाचा बऱ्याचदा उल्लेख आला आहे. अशातच ‘इट्स मज्जा’च्या गुढीपाडवा स्पेशल कार्यक्रमात अमीरने सपत्नीक उपस्थिती लावली होती. अमीर हडकर व वर्षा हडकर यांनी ‘इट्स मज्जा’च्या गुढीपाडव्याच्या खास कार्यक्रमात संवाद साधला. यावेळी त्यांनी आपली हटके लव्हस्टोरी शेअर केली.
यावेळी वर्षा यांनी त्यांची हटके लव्हस्टोरी सांगताना असं म्हटलं की, “एका कार्यक्रमानिमित्ताने आमची मैत्री झाली. त्यानंतर बरेच वर्ष आम्ही चांगले मित्र होतो. मग काही काळाने माझ्या घरी लग्नाची बोलणी सुरु झाली आणि हे मी अमीरला सांगितले. तेव्हा त्याने “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे” असं म्हटलं. यावर मी त्याला असं नाही होऊ शकत म्हटलं कारण माझ्या घरी आधीच माझ्या लग्नाची बोलणी वगैरे झाली होती. मग पुन्हा आम्ही मित्र म्हणून भेटायला लागलो. यादरम्यान, माझ्या घरी लग्नाबद्दल सर्व तयारी सुरु होती. मग माझं लग्न ठरल्यानंतर ६ महिन्यांनी माझ्या मनात अमीर विषयी भावना तयार झाली आणि मला त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागलं”.
यापुढे अमीर असं म्हणाला की, “मी तिला काही आधी विचारलं होतं. पण तिने अवघ्या काही क्षणांतच मला नाही असं उत्तर दिलं होतं. तेव्हा माझी आईनेही मला वर्षाबरोबर लग्न करण्याचा सल्ला दिला होता. यादरम्यान आम्ही शिवाजी पार्कमध्ये भेटायचो. मग काही दिवसांनी मी वर्षाचा वडिलांना भेटायला गेलो. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी मला “काय करतो?” असं विचारलं तेव्हा मी त्यांना वादक असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी मला पुन्हा वर्षा जशी बँकेत कामाला आहे तसं तुम्ही काय करता? म्हणून विचारलं”.
यापुढे त्याने असं म्हटलं की, “मी त्यांना थेट सांगितलं की, वर्षा आणि माझ्यात प्रेम नाही. पण आमच्यात एक खास बॉन्ड आहे आणि आम्ही खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे आम्ही चांगले नवरा-बायको होऊ शकतो. पण जर तुम्ही आता नाही म्हणालात तर आम्ही फक्त मित्रच राहू, पण माझ्यासारखा चांगला मुलगा तुम्हाला मिळणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. यापुढे मग काही दिवसांनी आम्ही एकमेकांशी लग्न केले आणि आता आमच्या लग्नाला १६ वर्षे पूर्ण झाली आहेत”.