शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 28, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Aishwarya Rai and Abhishek Bachchan maybe shift in abroad with daughter Aaradhya

लेकीसह भारत सोडून दुसऱ्या देशामध्ये राहायला जाणार ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन, आराध्याला बच्चन कुटुंबियांपासूनही दूर ठेवणार कारण...

घर म्हटलं की भांड्याला भांडं हे लागणारच आणि या भांड्यांचा आवाज हा घराबाहेर जाणारच. कुटुंब म्हणून कितीही एकत्र राहण्याचा प्रयत्न केला तरीही कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद, वादविवाद, रुसवे-फुगवे हे होतच असतात. सामान्य कुटुंबासह अगदी बॉलिवूडमधील मोठ्या घराण्यातदेखील हे मतभेद व वादविवाद होत असतात. गेले काही दिवस बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबियांबद्दलचे अनेक वाद सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. यामुळे अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय आपल्या लेकीसह बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’मधून बाहेर पडल्याचे वृत्त आले होते.

अशातच आता त्यांच्याबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन आता मुलगी आराध्याबरोबर परदेशात राहणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आराध्या बच्चन आपल्या पुढील शिक्षणासाठी परदेशात जाणार असल्याचे म्हटले जात आहे. आराध्या बच्चन ही सध्या दहावीचे शिक्षण घेत असून हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती पुढील शिक्षण घेण्यासाठी लंडन किंवा न्यूयॉर्कला जाणार असल्याची माहिती आहे.

View this post on Instagram

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

आणखी वाचा – आदिती राव हैदरीने सुप्रसिद्ध अभिनेत्याबरोबर दुसऱ्यांदा थाटला संसार, पहिल्या घटस्फोटानंतर लग्नाचा निर्णय, विवाहाबाबत सत्य समोर

आराध्या ही बॉलिवूडमधील काही स्टारकिड्सपैकी एक आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक कृतीवर मीडियाची नजर असते. अशातच तिने नुकतेच होळीनिमित्त काही खास फोटो शेअर केले. आराध्याचे हे होळी खेळतानाचे फोटो चाहत्यांना खूप आवडले. बच्चन कुटुंबासाठी ही होळी खूप खास असल्याचे बोलले जात आहे. आराध्या परदेशात जाणार असल्यामुळे यंदाची होळी तिच्यासाठी खास होती.

आणखी वाचा – नवऱ्यासह ऑस्ट्रेलियामध्येच राहत आहे पूजा सावंत, असं जगत आहे आयुष्य, बायकोसाठी सिद्धेशने बनवला पुलाव, म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

दरम्यान, घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान मुलगी आराध्या बच्चनच्या शाळेच्या कार्यक्रमातही ऐश्वर्या व अभिषेक एकत्र दिसले होते. त्यानंतर ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या प्रीमिअरसाठी संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळीसुद्धा अभिषेक व ऐश्वर्या एकत्र दिसले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच त्यांच्या परदेशात जाण्याची बातमी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Tags: abhishek bachchanAISHWARYA RAIentertainemnt news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Kangana Ranaut On Her Flop Cinema

"त्याचे १० चित्रपट फ्लॉप आणि…", कंगना रणौतने शाहरुख खानबरोबरच केली स्वतःची तुलना, म्हणाली, "संपूर्ण जगात त्याच्यासारखा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.