महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.हास्यजत्रेन प्रेक्षकांच्याही मनात हक्काचं स्थान निर्माण केलं.हास्यजत्रेतील सर्व स्किट्स सादरीकरण करण्यामध्ये अनेकांची मेहनत आणि कष्ट असतात.यावर लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ असे अनेक लोक मेहनत घेताना दिसतात.यातीलच दोन नाव म्हणजे सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे. सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असून ते हास्यजत्रेतील अनेक bts व्हिडीओ शेअर करतात आणि हे bts सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. तसेच सचिन गोस्वामी नेहमी कलाकारांसाठी स्पेशल पोस्ट लिहीत कलाकारांचं कौतुक देखील करतात. अश्यातच सचिन गोस्वामी यांनी विनोदाची क्वीन विशाखा सुभेदार हिच्यासाठी खास पोस्ट केली आहे.(Vishaka Subhedar)

पाहा सचिन गोस्वामींची विशाखासाठी स्पेशल पोस्ट
विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार हिचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त सचिन गोस्वामी यांनी विशाखा सुभेदार हिच्यासाठी खास पोस्ट केली. त्यांनी फेसबुकवर विशाखाचा एक फोटो शेअर करत, हास्यजत्रेची जत्रेकरी विशाखाचा आज वाढदिवस…अभिनयातील सर्व छटा सहज सुंदर सादर करणारी एक अष्टपैलू अभिनेत्री, wetcloud च्या प्रवासातील स्थापनेपासून सोबत असणारी मैत्रीण, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि हास्यजत्रा या दोन्हीच्या यशात विशाखाचे मोलाचे योगदान आहे. जत्रेतील तिच्या अनेक भूमिका अजरामर आहेत. विशाखा, तुझ्या वाटचालीस आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा… तुझ्या सर्व आकांक्षा पूर्ण होवो हि सदिच्छा… अश्या शब्दांत तिच्यासाठी असलेल्या भावना व्यक्त केल्यात.(Vishaka Subhedar)
====
हे देखील नक्की वाचा-ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते पुन्हा अडकल्या विवाहबंधनात; फोटो पोस्ट करत दिली ही आनंदाची बातमी
====

विशाखा ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग होती. तिने हास्यजत्रा सोडल्याने अनेक चाहत्यांनी नाराजगी व्यक्त केली. आजही अनेक चाहते तिला पुन्हा हास्यजत्रेत या अशी विनंती करत आहेत.विशाखाने हास्यजत्रा सोडली असली तरी तिची हास्यजत्रेतील कलाकारांसोबत एक घनिष्ट मैत्री असलेली पाहायला मिळते. विशाखा ही सध्या शुभविवाह या मालिकेत एक नकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मालिकेसोबतच विशाखा गरम किटली या चित्रपटातून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती अभिनयासोबतच उत्तम नृत्यांगना देखील आहे. ती अनेक डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करते आणि या व्हिडिओला चाहत्यांची देखील चांगली पसंती मिळते.