मराठी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे खऱ्या आयुष्यात भावंडं आहेत. ही भावंड एकमेकांच्या सपोर्टला नेहमीच उभे असतात. अशीच मराठी सिनेसृष्टीतील भावंडांपैकी लोकप्रिय जोडी म्हणजे अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेत्री खुशबू तावडे. तितीक्षा व खुशबू या सख्ख्या बहिणी असून दोघीही मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. खुशबू ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर तितीक्षा ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. दोघीही बहिणी ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत. (Titeeksha Tawde and Khushboo Tawde)
सोशल मीडियावरील त्यांच्या फोटोंमधून त्यांच्यात असलेलं बाँण्डिंग नेहमीच पाहायला मिळतं. खुशबू व तितिक्षा ही बहिणींची जोडी मराठी टेलिव्हिजनवर चांगलीच प्रसिद्ध आहे. त्या दोघींचं एकमेकींवर नितांत प्रेम आहे. दोघीही एकमेकींच्या सख्खा बहिणी असल्या तरीही त्या कायमच मैत्रिणीसारख्या राहतात. दोघी एकमेकांना वेळोवेळी सरप्राईज ही देताना पाहायला मिळतात. शिवाय ते एकत्र अनेक रील्स, फोटो शेअर चाहत्यांसह शेअर देखील करतात.
अशातच गेल्या महिन्यात तितीक्षाचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लगीनगाठ बांधली. तितीक्षाच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. बहिणीच्या लग्नात खुशबूने खूप धावपळ केलेली पाहायला मिळाली. तितीक्षाच्या लग्नात खुशबू तिच्या जबाबदाऱ्या पार पाडताना दिसली. अशातच तितीक्षाने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. यांत तितीक्षा तिच्या मोठ्या बहिणीला म्हणजेच खुशबूला ‘एकेकाळी तू माझी शाळेची बॅग भरायची ते पुढचा क्षण तू माझी लग्नाची बॅग भरत आहेस”, असं म्हणत दोघीही एकमेकांना घास भरवत बॅग भरताना दिसत आहेत. यावरून दोघींचा बॉण्ड दिसून येतो.
तितीक्षा व खुशबूमध्ये खूप घट्ट बॉण्ड आहे. खुशबू तितीक्षाची आईसारखी काळजी घेताना दिसते. रक्षाबंधनाला दोघीही एकमेकींना राखी बांधतात. बरीच वर्ष त्या कामातून वेळात वेळ काढत प्रत्येक सणाला एकत्र असतात. तितीक्षाच्या लग्नातही या दोन्ही बहिणींचा पारंपरिक अंदाज साऱ्यांना विशेष भावला.