वर्षभरातील रंगाचा सण म्हणून ‘होळी’ हा सण ओळखला जातो. हा सण सर्वजण आनंदाने साजरा करतात. भारतामध्ये प्रत्येक सणाला काही पारंपारिक व वैज्ञानिक दृष्टिकोण असतो. त्यामुळे काही ना काही समजुती व प्रथा सणाशी निगडीत आहेत. प्रत्येक व्यक्ती ही स्थळ, काळ, विचार यानुसार सण साजरे करत असते. पण सण साजरे करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्या सणाचे चांगले परिणामही पाहायला मिळतात. (holi 2024 dos and don’t)
दरवर्षी होळी पेटवून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण फाल्गुन माहिन्यात कृष्ण पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा करण्यात येतो. या वर्षी होळी २४ मार्च २०२४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. पण होळी पेटवण्याच्या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नयेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

सर्वात आधी जाणून घेऊया होळीच्या दिवशी काय करु नये ?
होळी पेटवताना जरूर सहभाग घ्यावा. तसेच काही कारणामुळे तिथे हजर राहणं शक्य नाही तर दुसऱ्या दिवशी सुर्योदयापूर्वी होळीच्या भोवती तीन प्रदक्षिणा माराव्यात.
जर तुम्हाला पैशांची गरज असेल किंवा कोणाकडून उधारीने पैसे घ्यावे लागले तर होळी पेटवण्याच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. असे केल्यास तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
होळी पेटवण्याच्या वेळी आगीमध्ये आपल्या आपल्या घरातील कचरा टाकू नये. असे करणे शास्त्रामध्ये योग्य मानले जात नाही.
जर तुम्ही होळी पेटवण्यासाठी जात असाल तर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये. तुम्ही तांदूळ, किंवा शेणी घेऊन जाऊ शकता आणि त्याची तुम्ही अग्नीमध्ये आहुती देऊ शकता. तुम्ही गहू किंवा हरभरा अग्नीमध्ये भाजून तो प्रसाद म्हणून ग्रहण करु शकता.
तसेच होळी पेटवण्यासाठी जात असताना माहिलांनी केस मोकळे सोडू नये. या दिवशी नकारात्मक शक्ती अधिक प्रभावशाली असतात असे मानले जाते.
आता जाणून घेऊया की होळीच्या दिवशी काय करावे ?
होळी पेटवण्यासाठी तुम्ही जेव्हा जाणार असाल तर स्वतःजवळ काजळाची डबी ठेवावी.
जर नजर लागण्याची शक्यता असेल तर नारळ स्वतः भोवती सात वेळा फिरवावा आणि तो अग्नीमध्ये समर्पित करावा.
उटण शरीराला लाऊन जो मळ निघेल तो अग्नीमध्ये समर्पित करावा. यामुळे आरोग्यप्राप्ती होते.