बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. आलियाने आजवर तिच्या अभिनयाने व सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आलिया भट्टचा १५ मार्च रोजी वाढदिवस झाला. आलिया ३१ वर्षांची झाली आहे. यानिमित्त प्रत्येकजण अभिनेत्रींवर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. आलियाने वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित केली होती. आलियाच्या बर्थडे पार्टीतील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Alia Bhatt Birthday Party)
आलिया भट्टने तिचा ३१वा वाढदिवस कुटुंबाबरोबर व तिच्या मित्र परिवाराबरोबर साजरा केला. आलियाच्या वाढदिवसाला इशा अंबानी व आकाश अंबानीही सहभागी झाले होते. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आलिया पती रणबीर कपूर, सासू नीतू कपूर, बहीण शाहीन भट्ट, आई सोनी राजदान व इशा अंबानी-आकाश अंबानी यांच्यासह एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसली.
या वाढदिवसाच्या पार्टीत आलिया आणि तिचे संपूर्ण कुटुंब दिसले, पण तिची लाडकी लेक राहा दिसली नाही. राहा अनेकदा तिच्या आई-वडिलांसह दिसत असते. याआधी राहा अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये दिसली होती, जिथे प्रत्येकजण तिच्या क्युटनेसच्या प्रेमात पडले. तर नीतू कपूरने सूनेच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. यावेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. अगदी हटके स्टाइलमध्ये नीतू कपूर यांनी लावलेल्या हजेरीने या पार्टीत हवा केली. हसत हसत त्या पापाराजीसाठी पोज पोज देताना दिसल्या.
आलियाच्या वाढदिवसाच्या पार्टीत ईशा व आकाश अंबानीही हजर होते. दोघेही रणबीर व आलियाचे खूप जवळचे मित्र आहेत. एवढेच नाही तर ईशा अंबानी ही आलियाची बिझनेस पार्टनर आहे. आलियाच्या लूकबद्दल बोलायचे तर, यावेळी बर्थडे गर्ल आलियाने ब्लू डेनिमसह ट्यूब टॉप परिधान केला होता. कमीत कमी मेकअप आणि मोकळ्या केसांत आलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. तर ब्लॅक लूकमध्ये रणबीर कपूरही खूपच उठून दिसत होता. समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये आलिया व रणबीर त्यांच्या पाहुण्यांना भेटतानाही दिसले.