मंगळवार, जून 3, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; लग्नानंतर अशी नटली तितीक्षा तावडे, मराठमोळा लूक व्हायरल, अभिनेत्री म्हणते, “मराठी मुलगी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 12, 2024 | 5:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Titeeksha Tawde Maharashtrian Look

निळ्या रंगाची साडी, पारंपरिक दागिने अन्…; लग्नानंतर अशी नटली तितीक्षा तावडे, मराठमोळा लूक व्हायरल, अभिनेत्री म्हणते, “मराठी मुलगी…”

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री तितीक्षा तावडे हिने तिच्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेमुळे तितीक्षाला विशेष लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय तितीक्षा चर्चेत आली ती म्हणजे तिच्या लग्नामुळे. नुकताच तितीक्षा तावडेचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेसह लग्नगाठ बांधली आहे. दोघांच्याही अफेअरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगल्या होत्या, मात्र त्यांनी थेट केळवणाचे फोटो शेअर करत त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली. (Titeeksha Tawde Maharashtrian Look)

त्यानंतर तितीक्षा व सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी थाटामाटात ही जोडी विवाहबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाचेही अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसले. लग्नानंतर लगेचच दोघांनीही कामाला सुरुवात केली. तितीक्षाने मालिकेतून काही दिवस ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा ती मालिकेत परतली आहे. लग्नानंतर तितीक्षा तिच्या संसारात रमलेली दिसली.

आणखी वाचा – रामाची भूमिका साकारण्यावरुन अरुण गोविल यांनी रणबीर कपूरबाबत केलेलं विधान चर्चेत, म्हणाले, “या भूमिकेसाठी…”

View this post on Instagram

A post shared by Titeekshaa Tawde (@titeekshaatawde)

अशातच तितिक्षाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. “नुकतीच लग्न झालेली मराठी मुलगी”, असं खास कॅप्शन देत तितीक्षाने लग्नानंतरचा तिच्या लूकचा एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. यांत नव्या नवरीबाईच्या लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. निळ्या रंगाच्या काठपदरच्या साडीमधील तितीक्षाचा हा मराठमोळा लूक खूप खास दिसत आहे. तर हातात बांगड्या, गळयात मोजकेच दागिने आणि मंगळसूत्र घातलेल्या या महाराष्ट्रीयन लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या.

आणखी वाचा – सिद्धू मुसेवालाची आई गरोदर आहे की नाही ?, वडिलांनी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लवकरच आम्ही…”

तितीक्षाच्या या मराठमोळ्या लूकला चाहत्यांच्या पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेमध्ये सिद्धार्थ व तितीक्षा यांनी एकत्र काम केलं होतं. मालिकेमध्ये काम करताना दोघांची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. तितीक्षा व सिद्धार्थच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पहायला मिळाली.

Tags: entertainmentTiteeksha Tawade And Siddharth Bodketiteeksha tawdetiteeksha tawde marathi looktiteeksha tawde traditional look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

seema kapoor torchered by own mother
Entertainment

आईकडून मारहाण, टॉर्चर अन् हाल; सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला वाईट काळ, जन्मदातीच वैरी ठरली तेव्हा…

जून 2, 2025 | 7:00 pm
Premachi Goshta fame Swarda Thigales car accident
Entertainment

‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

जून 2, 2025 | 5:58 pm
Vaishnavi Hagawane Death
Entertainment

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ कोणाजवळच राहीना, आईविना लेकराचे रडून-रडून हाल, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

जून 2, 2025 | 5:00 pm
Radhika Apte Motherhood
Entertainment

बाळ होण्याच्या एक दिवस आधीपर्यंत केलं काम, अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतील सत्य, म्हणाली, “इथं काम करणं…”

जून 2, 2025 | 3:30 pm
Next Post
Pushkar Jog On Oscar

'ओपेनहाइमर’साठी सिलियन मर्फीला ऑस्कर मिळताच पुष्कर जोग बोलला, पोस्ट शेअर करत म्हणाला, "माझा मराठी चित्रपट…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.