शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रामाची भूमिका साकारण्यावरुन अरुण गोविल यांनी रणबीर कपूरबाबत केलेलं विधान चर्चेत, म्हणाले, “या भूमिकेसाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 12, 2024 | 3:58 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Arun Govil give his reaction to Ranbir Kapoor playing the role of Ram in the upcoming film Ramayan

रामाची भूमिका साकारण्यावरुन अरुण गोविल यांनी रणबीर कपूरबाबत केलेलं विधान चर्चेत, म्हणाले, “या भूमिकेसाठी...”

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा त्याचया ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला. याआधी अभिनेत्याने अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याच्या यनिंमळ चित्रपटाची चांगललीच चर्चा रंगली. अशातच रणबीर त्याच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात रणबीर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे अनेकजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

यावर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच छोट्या पडद्यावर रामायण मालिकेद्वारे रामाची भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते अरुण गोविल यांनीही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अरुण गोविल यांना रणबीर कपूर साकारत असलेल्या रामाच्या भूमिकेबद्दल त्यांचे मत विचारले गेले. यावेळी त्यांनी उत्तर देत असं म्हटलं की, “येणारा काळचं याबद्दल नेमके उत्तर देईल असं मला वाटतं. रणबीरबद्दल म्हणायचे झाले तर तो एक चांगला अभिनेता आहे. त्यामुळे तो साकारणार असलेल्या भूमिकेबद्दल मी आता काहीही बोलणे उचित होणार नाही”.

View this post on Instagram

A post shared by Arun Govil (@siyaramkijai)

आणखी वाचा – लेकीच्या डेटच्या चर्चांना बोनी कपूर यांनी दिला पूर्णविराम?, शिखर पहाडियाबरोबर दिसले पण…; नेमकं काय घडलं?

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “रणबीर हा एक पुरस्कार विजेता अभिनेता आहे. त्याला मी जितकं ओळखतो त्याप्रमाणे त्याच्यात अनेक मूल्ये आणि संस्कृती आहेत. तो खूप संस्कारी मुलगा आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, तो या भूमिकेसाठी त्याच्या पद्धतीने सर्वोत्तम देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामुळे कोणाबद्दल आता काहीच सांगता येणार नाही. येणारा काळच यावर नेमके उत्तर देईल.”

आणखी वाचा – “एक-दोन वर्षात खूप चढ-उतार आले पण”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल रणदीप हुड्डा स्पष्टच बोलला, म्हणाला, “जे झालं ते…”

दरम्यान, आत्तापर्यंत नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटासाठी अनेक सकलाकारांची नावे समोर आली आहेत. मात्र रणबीर कपूर व साई पल्लवी यांच्या नावावर श्री राम व सीता यांच्या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तसेच सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत, लारा दत्त कैकयी आणि अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Tags: Arun Govilbollywood actorBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsranbir kapoorअरुण गोविलबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीरणबीर कपूर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Next Post
Siddhu moose wala father post

सिद्धू मुसेवालाची आई  गरोदर आहे की नाही ?, वडिलांनी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाले, “लवकरच आम्ही..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.