मनोरंजन क्षेत्रातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर पुरस्कार २०२४’ ची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘ओपनहायमर’ या चित्रपटाने बाजी मारली असून किलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले आहे. ऑस्करविजेत्याला सोनं व ब्रिटेनिअमपासून बनवलेली ट्रॉफी,प्रशस्तिपत्र, तसेच भारतीय चलनानुसार जवळपास १८ लाख रुपयांचं गिफ्ट व्हाऊचर दिले जाते. ऑस्कर पुरस्कार मिळणे हे फार मानाचे समजले जाते.विजेत्याबरोबरच नामांकान मिळालेल्यांनाही आकर्षक भेटवस्तू मिळते. (Oscar award 2024 nominee)
ऑस्कर सोहळ्यासाठी नामांकन मिळालेल्या कलाकारांना गुडी बॅग दिली जाते. या वर्षी दिल्या गेलेल्या गुडी बॅगची किंमत १.४ कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. या गुडी बॅगमध्ये नक्की काय काय असते हे जाणून घेऊया. दरवर्षी या गुडी बॅगची किंमत वेगवेगळी असते. या वर्षी गुडी बॅगमध्ये ५० पेक्षा अधिक वस्तू दिल्या गेल्या आहेत. नामांकन मिळालेल्या कलाकारांना स्वित्झर्लंडच्या ‘स्की शॅलेट लग्जरी व्हेकेशन’चे पास मिळाले असून त्यांची किंमत जवळपास ४१ लाख रुपये आहे. तसेच ९ जणांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याची परवानगी असते. या व्हेकेशनमध्ये ४ दिवस राहण्याचा आनंद घेता येईल. तसेच दक्षिण कॅलिफोर्नियाच्या ‘गोल्डन डोअर स्पा’मध्ये सात दिवसांचा पासही मिळतो. ज्याची किंमत १९ लाख रुपये आहे.
त्याचप्रमाणे एक २७००० रुपये किंमतीची हँडमेड हँडबॅग मिळते. तसेच १ लाख रुपयांचे पोर्टेबल ग्रीलही दिले जाते. यामध्ये सायसोस्योरचा एक मायक्रो निडलिंग ट्रीटमेंट मिळते ज्याची मदत त्वचा टाईट करण्यासाठी होतो. याची किंमत ८.२ लाख रुपये असून सर्वात कमी किंमतीची भेटवस्तू १२०० रुपयांची रुबिक क्युब आहे.
याव्यतिरिक्त अनेक महागड्या ब्रॅंडची सौंदर्यप्रसाधने, स्कीन केअर प्रोडक्ट आणि लाईफस्टाइलच्या वस्तुही मिळतात. या गुडी बॅगचा खर्च ऑस्कर आयोजक करत नसून लॉस एंजलिस मार्केटिंग कंपनी ‘डिस्टिंक्टव्ह ॲसेट’ करते. या वर्षी ‘टू किल अ टायगर’ हा एकच चित्रपट ऑस्कर २०२४ च्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.