मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझी अशी इच्छा आहे की…”, देओल कुटुंबातील सुप्रसिद्ध अभिनेता स्वतःलाच म्हणत आहे पॉर्नस्टार, म्हणाला, “मी स्वतः एक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 5, 2024 | 4:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Abhay Deol Viral Post

"माझी अशी इच्छा आहे की...", देओल कुटुंबातील सुप्रसिद्ध अभिनेता स्वतःलाच म्हणत आहे पॉर्नस्टार, म्हणाला, "मी स्वतः एक..."

देओल कुटुंबातील अभिनेता अभय देओल हा हिंदी चित्रपटसृष्टीतील अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. अभयने त्याच्या चित्रपट कारकिर्दीत ‘देव डी’सारख्या अनेक चित्रपटांमधून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. १९ वर्षांपूर्वी दिग्दर्शक इम्तियाज अली दिग्दर्शित ‘सोचा ना था’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटाच्या वर्धापनदिनानिमित्त अभय देओलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत स्वत:ला पॉर्न स्टार म्हणवून घेत केलेलं आश्चर्यकारक विधान चर्चेत आलं आहे. (Abhay Deol Viral Post)

‘सोचा ना था’ या चित्रपटाला १९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभय देओलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चित्रपटाचे पोस्टर शेअर केले असून त्यात बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकिया देखील दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, २००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सोचा ना था’ चित्रपटाबाबत खास संदेश लिहिला आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने म्हटले आहे की, “१९ वर्षांपूर्वी या चित्रपटाद्वारे मी इंडस्ट्रीत पदार्पण केले. आताही कालच घडल्यासारखं वाटतंय. या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आणि आम्ही खूप निरागसही होतो. तथापि, मला खूप आनंद आहे की, मी पीआर पॉलिसीद्वारे वा ब्रँडच्या साहाय्याने स्वतःची स्थापना केली नाही. पण जवळपास दोन दशकांनंतरही मी चित्रपट करत आहे”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडितची मोठी घोषणा, आता हिंदी निर्मात्यांसह करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

View this post on Instagram

A post shared by Abhay Deol (@abhaydeol)

पुढे त्याने लिहिले आहे की, “मी निवडलेल्या चित्रपटांच्या आधारे मी स्वतः एक ब्रँड बनलो आहे. या काळात मी यश व अपयश या दोन्हींचा सामना एकट्याने केला आहे. तरी माझी अशी इच्छा आहे की, माझ्याकडे चित्रपटासाठी माझा स्वतःचा स्टायलिस्ट असेल आणि कोणीतरी मला सांगेल की, मी ७०च्या दशकातील पॉर्नस्टारसारखा दिसतो”.

आणखी वाचा – ओले काजूगर, शेती अन्…; बायको अंदमानमध्ये तर कोकणात आजोळी रमला प्रथमेश लघाटे, दाखवली गावाची संपूर्ण झलक

अभय देओल यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने लोकप्रिय चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने ‘ओये लकी’, ‘लकी ओये’, ‘देव डी’, ‘आहिस्ता आहिस्ता’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’, ‘आयशा’, ‘रांझना’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. येत्या काळात तो ‘व्हॅन टिक्की’ या चित्रपटात दिसणार आहे.

Tags: abhay deolabhay deol instagram postabhay deol moviebollywood actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

actor Govinda wife blame Bollywood
Entertainment

“गरीब पुढे गेलेला बॉलिवूडला बघवलं नाही”, इंडस्ट्रीत गोविंदाचा छळ झाल्याचा पत्नी सुनीताचा आरोप, बदनामी केली अन्…

मे 13, 2025 | 1:10 pm
Operation Sindoor
Women

उत्तरप्रदेशमधील पालकांचा अभिमानास्पद निर्णय, १७ नवजात मुलींची नावं ठेवली ‘सिंदूर’ कारण…

मे 13, 2025 | 12:23 pm
Pawandeep Rajan Health Update
Entertainment

Video : थांबायचं नाय गड्या; पवनदीपने रुग्णालयात गायलं गाणं, भीषण अपघातानंतर अशी आहे परिस्थिती, शस्त्रक्रिया झाल्यानंतर…

मे 13, 2025 | 11:51 am
Shruti Atre Shared Goodnews
Entertainment

मालिकांमधील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो, सुंदर लूकने वेधलं लक्ष

मे 13, 2025 | 11:33 am
Next Post
Sunil Pal posted a video and criticized Kapil Sharma show after realizing promo

गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्...; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, "लायकीही नाही की..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.