मंडळी समजातील एखाद्या प्रतिष्ठित, साहसी, हुशार व्यक्तिमत्वा बद्दल इतिहासात बरीच माहिती आहे पण त्या व्यक्तित्वच्या बाजू बाजू मांडण्यासाठी त्याच्या आयुष्यावर एखादा चित्रपट, वेब सिरीज बनवली जाते. बायोपिक्सच्या या शर्यतीत मराठी इंडस्ट्रीतील एक नाव अगदी हक्काने घेतलं जात ते म्हणजे अभिनेता सुबोध भावे.(Subodh Bhave Saint Tukaram Maharaj)
डॉ. काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व, लोकमान्य टिळक अशा अशा महान व्यक्तिमत्वांचे बायोपिक साकारल्या नंतर आता सुबोध भावे जगतगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे. आगामी चित्रपटातील तुकाराम महाराजांच्या पेहरावा मधील एक फोटो सुबोध ने त्याच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला आहे.
फोटो पोस्ट करत सुबोध ने कॅप्शन मध्ये ‘”संत तुकाराम” आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे. ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक @theadityaom यांचा मी कायमचा ऋणी आहे. तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे. ती यथावकाश कथन करीन. माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार आता कोठे धावे मन, तुझे चरण देखीलिया !(Subodh Bhave Saint Tukaram Maharaj)

पोस्ट मध्ये सुबोध ने या संधी बद्दल दिगदर्शकाचे आभार देखील मानले आहेत तसेच हि भूमिका साकारण्या मागे एक छान गोष्ट आहे असं ती लवकरच सांगेन असं म्हणत सुबोधने चाहत्यांची आतुरता अजून वाढवली आहे. पोस्ट च्या शेवटी सुबोधने संत तुकारामांच्या अभंगातील एक ओवी लिहीत सर्वांचे आभार मानले आहेत.
====
हे देखील वाचा – मराठी अभिनेत्रीकडे अश्लील व्हिडिओची मागणी अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा
====
तर नुकताच सुबोधची महत्वाची भूमिका असलेली ताज ही वेब सिरीज प्रदर्शित झाली असून त्यालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अकबर दरबारातील चतुर व्यक्तिमत्व असणाऱ्या बिरबलची भूमिका या वेब सिरीज मध्ये सुबोध ने साकारली आहे. तर सुबोध साकारत असलेल्या तुकाराम महाराजांच्या भूमिकेतील फोटोला कमेंट्स मार्फत भरभरून प्रेम मिळत आहे.