Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding : गेले काही दिवस छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके हे दोघे चांगलेच चर्चेत आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’चे औचित्य साधत या दोघांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. तेव्हापासून त्यांच्या चाहत्यांना दोघांचे लग्नाचे वेध लागले होते. अशातच ही जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सिद्धार्थच्या एका मित्राने लग्न लागताच दोघांबरोबरचा एकत्र एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तितीक्षा व सिद्धार्थ दोघेही नववधूवराच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
लग्नासाठी तितीक्षा व सिद्धार्थने खास लूक केला असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तितीक्षाने ऑफ व्हाईट रंगाची नऊवारी साडी नेसली होती तर या साडीला साजेसा असा पिवळ्या रंगाचा डिझाइनर ब्लाऊजही परिधान केला आहे. तर सिद्धार्थने तितीक्षाच्या लूकला साजेसा असा ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी व त्यावर धोतर परिधान केला होता. त्यांचा हा खास लूक चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे.
तितीक्षा व सिद्धार्थने एकमेकांना वरमाला परिधान करताच तितीक्षाला अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. सिद्धार्थने तितीक्षाच्या गळ्यात वरमाला घालताच तितीक्षाला रडू आले. तितीक्षा आपल्या लाडक्या जोडीदाराबरोबर विवाहबंधनात अडकताच तिला अश्रु जमा झाले. अर्थातच तितीक्षाच्या डोळ्यात आलेले हे अश्रु आनंदाचे आहेत.
आणखी वाचा – ‘कॅप्टन मार्वेल्स’ फेम केनेथ मिशेल यांचे निधन, वयाच्या ४९व्या वर्षी ‘या’ गंभीर आजाराने मृत्यूला गाठलं अन्…
दरम्यान, निसर्गाच्या सानिध्यात तितीक्षा व सिद्धार्थने एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली आहे. तितीक्षा व सिद्धार्थ गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मैत्रीपासून सुरु झालेल्या त्यांच्या नात्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि अखेर आज दोघांनी एकममेकांबरोबर लगीनगाठ बांधली आहे. दोघांनीही सहजीवनाच्या प्रवासाचं एक पाऊल टाकलं आहे.