बॉलिवूड सिनेसृष्टीतून सतत बऱ्याच वाईट घटना कानावर पडत आहेत. काही कलाकारांच्या निधनाच्या तर, काहींच्या घटस्स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत. अशातच बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी भूषण कुमार व त्याची पत्नी दिव्या खोसला यांच्या घटस्फोटाच्या अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. भूषण कुमारच्या पत्नीचा एका कृतीने या चर्चांना उधाण आलेलं पाहायला मिळालं. दिव्या खोसला यांनी नुकतेच सोशल मीडियावरुन तिच्या नावामधून पतीचे आडनाव काढले. इतकंच नाही तर तिने पतीची ‘टी-सीरीज’ या कंपनीच्या ऑफिशिअल अकाऊंटलाही अनफॉलो केलं होतं. (Bhushan Kumar And Divya Khossla Divorce Rumors)
भूषण कुमार व दिव्या खोसला यांच्या मतभेदाबाबत चर्चा सुरु झाली आणि आता हे जोडपे घटस्फोट घेऊ शकतात, अशा चर्चा रंगल्या आहेत. मात्र, समोर आलेल्या वृत्तानुसार दिव्याचे आडनाव काढण्यामागे काहीतरी वेगळेच कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक असलेल्या भूषण कुमार व दिव्या खोसला यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
२१ फेब्रुवारीला दिव्या खोसला कुमारने तिच्या इंस्टाग्राम हँडलवरुन भूषण कुमारचे नाव काढून टाकले होते आणि त्याच्या ‘टी-सीरीज’ या कंपनीलाही अनफॉलो केलं होतं. दोघांच्या लग्नाला जवळपास १९ वर्षे झाली आहेत. त्यामुळे दिव्याने उचललेल्या या पाऊलाने चाहत्यांना धक्का बसला आहे. दोघेही एका मुलाचे पालक आहेत आणि अनेकदा सार्वजनिक ठिकाणी वा प्रमोशनल इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसतात. मात्र, अलीकडच्या काळात दोघेही कोणत्याही कार्यक्रमात एकत्र दिसले नाहीत. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा पसरल्या. तर एकीकडे दिव्या अजूनही भूषण कुमारचे वैयक्तिक अकाऊंट फॉलो करत असल्याचंही समोर आलं.
आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेला मोठा धक्का, ईडीकडून अभिनेत्याला समन्स, नेमकं प्रकरण काय?
‘झूम’ वाहिनीने दिलेल्या रिपोर्टनुसार, भूषण कुमारच्या टीमने त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचं म्हटलं आहे. ‘टी-सीरीज’च्या प्रवक्त्याने या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले असून दिव्याने ज्योतिषीय कारणांमुळे हे केले असल्याचं सांगण्यात आलं. ते म्हणाले, “हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि लोकांनी त्यांचा आदर केला पाहिजे”. शिवाय तिने आपल्या आडनावांत अधिक ‘एस’ हे लेटर जोडण्याबाबत बोलताना ते म्हणाले की, “त्यांनी ज्योतिषशास्त्रीय कारणांमुळे हे केले आहे”.