शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचं निधन, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 14, 2024 | 6:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prakash Koleri Death

प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश कोलेरी यांचं निधन, राहत्या घरात मृतावस्थेत आढळले

भारतीय चित्रपटसृष्टीतून एकामागोमाग एक वाईट बातम्या येत आहेत. प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री मल्लिका राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर केरळ चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय दिग्दर्शक प्रकाश कोलेरी हे मंगळवारी वायनाड येथील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या घरी ते एकटेच राहत होते. प्रकाश कोलेरी यांनी त्यांच्या दिग्दर्शन कारकिर्दीची सुरुवात ‘मिजीथलील कन्निरुमयी’ (१९८७) या चित्रपटाद्वारे केली, त्यांचा शेवटचा चित्रपट २०१३मध्ये प्रदर्शित झालेला ‘पट्टुपुस्तकम’ हा होता. (Prakash Koleri Death)

प्रकाश कोलेरी यांच्या आकस्मिक निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते व कलाक्षेत्रातील कलाकार मंडळी त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. प्रकाश कोलेरी यांनी ‘अवन आनंदपद्मनाभन’, ‘वरुम वरतीरिक्किला’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याशिवाय त्यांनी इतर चार चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. कोलेरी यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पत्ता नव्हता. त्याचे नातेवाईक त्याच्या घरी पोहोचले असता त्यांना मृतदेह दिसला.

आणखी वाचा – हटके इंटिरिअर, स्वादिष्ट जेवण अन्…; शाहरुख खानच्या बायकोने मुंबईत सुरु केलं स्वत:चं आलिशान हॉटेल, सगळं काही आहे खास

प्रकाश कोलेरी यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी घटनास्थळ गाठले आहे आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरु केला. प्रकाश कोलेरी केरळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक होते. २०१३ साली त्यांचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दिग्दर्शनापासून दूर राहू लागले. त्यानंतर अनेक दिवस ते चित्रपटसृष्टीतही सक्रिय नव्हते.

आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी गोव्यातील ‘या’ आलिशान हॉटेलमध्ये करणार शाही विवाहसोहळा, जय्यत तयारी सुरु

अलीकडेच सुलतानपूरची प्रसिद्ध गायिका व अभिनेत्री विजय लक्ष्मी उर्फ ​​मलिका राजपूत हिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिनेत्रीचा मृतदेह घराच्या खोलीत लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Tags: malyalam directorprakash koleriprakash koleri passed awaysouth indian film
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Actor Ravindra Mahajani once used to drive a taxi, his wife says in the fourth issue of the book

“उत्पन्नाचा एक मार्ग म्हणून...”, टॅक्सी चालवण्याबाबत रवींद्र महाजनींच्या बायकोचा खुलासा, म्हणाल्या, “वेश्यांकडे गिऱ्हाईकांना...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.