शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अभिनय, निर्मितीनंतर आता ओटीटीवरही झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, हिंदी वेबसीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 4:05 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Marathi actress sharmishtha raut play role in raisinghani vs raisinghani hindi webseries see the details

अभिनय, निर्मितीनंतर आता ओटीटीवरही झळकणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री, हिंदी वेबसीरिजमध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

सध्या ओटीटीमुळे अनेक कलाकारांसाठी अभिनयाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठीत काम केल्यानंतर अनेक मराठी कलाकार ओटीटी क्षेत्रात आपले नशीब आजमावतात. यात अमेय वाघ, अमृता सुभाष, वैदही परशुरामी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, सौरभ गोखले, अनुजा साठे यांसारख्या अनेक कलाकारांनी आपला झेंडा रोवला आहे. अशातच आता यात आणखी एका मराठी अभिनेत्रीची भर पडणार आहे आणि ही मराठी अभिनेत्री म्हणजे शर्मिष्ठा राऊत.

मराठी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांत अभिनय करत शर्मिष्ठाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे. तसेच नुकतेच गेल्या वर्षी शर्मिष्ठाने निर्मिती क्षेत्रातदेखील पदार्पण केलं आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही शर्मिष्ठाची पहिली निर्मिती असलेली मालिका आहे. अशातच अभिनेत्री एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Sharmishtha Raut- Desai (@sharmishtharaut)

आणखी वाचा – फेब्रुवारी महिन्यात ओटीटीवर अनुभवता येणार सस्पेन्स, क्राईम अन् स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट व सीरिज, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

शर्मिष्ठाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्री ‘रायसिंघानिया वर्सेज रायसिंघानिया’ या हिंदी वेब सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. १२ फेब्रुवारीला ही सीरिज ‘सोनी लिव्ह’वर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये शर्मिष्ठा कुठली भूमिका साकारणार आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

आणखी वाचा – तब्बल १० वर्षांनी येणार ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा दूसरा भाग येणार, अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला…

दरम्यान, शर्मिष्ठाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तिच्या या पोस्टखाली कमेंट्समध्ये अनेकांनी तिच्या सीरिजमधील नवीन भूमिकेसाठी उत्सुकता दाखवली आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newssharmishtha rautमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनशर्मिष्ठा राऊत
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Actress model Poonam pandey husband sam Bombay reacts on her death also revealed that there was no divorce

पूनम पांडेच्या मृत्यूच्या खोट्या बातमीवर नवरा सॅम बॉम्बेची प्रतिक्रिया, घटस्फोट झाला नसल्याच्याही केला खुलासा, म्हणाला...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.