Poonam Pandey Died at 32 : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पुनम पांडेयच्या मृत्यूबाबत अचानक आलेल्या बातमीने मनोरंजन सृष्टीसह तिच्या चाहते मंडळींनादेखील धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आले असून या पोस्टमध्ये “आजची सकाळ खूपच निराशाजनक आहे. सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, सगळ्यांची लाडकी पूनम पांडेला आपण गर्भाशयाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे.” असं म्हटलं होतं. या पोस्टवर कुणालाही विश्वास बसत नव्हता. पण पूनमच्या मॅनेजरने स्वत: याबाबत खुलासा करत तिच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.
डिया टुडे’ व ’आजतक’ने पूनमच्या मॅनेजमेंट टीमशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून पूनमला कर्करोग या आजाराने घेरलं होतं. आणि शेवटच्या स्टेजचा हा कर्करोग होता. दरम्यान युपीमधील तिच्या घरीच ती राहत होती. तिथेच पूनमवर उपचारही सुरु होते. तिच्या पार्थिवावरही तिथेच अंत्यंसंस्कार होणार आहेत. तसेच अधिक माहिती अजूनही समोर आलेली नाही”.

पूनमच्या निधनाच्या बातमीवर कलाविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. पूनमच्या निधनाची बातमी येताच बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने तिचे दु:ख व्यक्त केलं आहे. कंगनाच्या ‘लॉकअप’ कार्यक्रमात पूनमने सहभाग घेतला होता. यादरम्यान त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. त्यामुळे आपल्या जवळील एक व्यक्ती अचानक निघून जाण्यावर कंगनाने दु:ख व्यक्त केलं आहे.
कंगनाने पूनमच्या निधनाच्या बातमीचे एक वृत्त तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केलं आहे आणि त्याखाली तिने असं लिहिलं आहे की, “हे खूपच दु:खदायक आहे. एका तरुण स्त्रीचा कॅन्सरमुळे बळी जाणे हे खूपच आपत्तीजनक आहे.” तसेच यापुढे तिने “ओम शांती” असं म्हणत पूनमला श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.