अभिनेता पुष्कर जोगने मराठा आरक्षणाच्या सर्वेवरुन केलेल्या वादग्रस्त विधानाने सर्वत्र गदारोळ माजला आहे. पुष्करने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केलेला पाहायला. माफी मागा अन्यथा आंदोलन अटळ असा इशाराही बीएमसी अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण जास्त न ताणता अभिनेत्याने सोशल मीडियावरुन स्टोरी पोस्ट करत बीएमसी कर्मचाऱ्यांची जाहीर माफी मागितलेली पाहायला मिळत आहे. (Kiran Mane Post)
याआधी अभिनेत्री केतकी चितळेदेखील याच संदर्भातील पोस्टमुळे चर्चेत आली होती. सरकारच्यावतीने सध्या जातगणना सुरु असून बीएमसी कर्मचारी प्रत्येक घरोघरी जाऊन काही प्रश्नोत्तर करत आहेत. यावेळी काही कर्मचारी केतकी चितळे राहत असलेल्या सोसायटीमध्ये देखील गेले होते. त्यावेळी केतकी चितळे हिने या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांचा एक व्हिडीओ बनवला. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चर्चेत आला यावरुन आता या कलाकारांवर कलाकारांनीच रोष व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे.
अभिनेते किरण माने यांनी पोस्ट शेअर करत केतकी व पुष्करची चांगलीच कानउघडणी केलेली पाहायला मिळत आहे. किरण माने यांनी फेसबुक अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत “पुष्कर बोलला किंवा केतकी जे बोलली ते तिचं मत आहे. किरण मानेंचं त्यावर ऑब्जेक्शन काय आहे??” असा प्रश्न त्यांना केला असता त्याचं उत्तर देतानाचा एक व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किरण माने यांनी केतकी चितळे व पुष्कर जोगला चांगलेच बोल लागवलेले पाहायला मिळत आहेत.
किरण माने यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “मला जात का विचारता? यावर तिने जर सरकारला सवाल केला असता तर ते मत व्यक्त करणं होतं. त्या कर्मचाऱ्याला त्याची जात विचारायची, त्यातून ऍट्रॉसिटीचा टोमणा मारायचा, हा जातीवाद नाही का? त्यानंतर “माझी ही जात अजिबात नाही” म्हणत स्वतःची जात सांगताना एक पोकळ अभिमान दाखवायचा. ज्या जातीचा अभिमान वाटायचं कुठलंही कारण नाही. तास इतिहासही नाही. मग त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो ना आपण, मत मांडणं वेगळं आणि दुसऱ्या जातीला कमी लेखणं वेगळं. आणि तुम्हाला एक सांगू का? सुप्त स्वर ऐका तुम्ही त्यांचे, स्वतःची जात सांगताना किंवा जोग कानाखाली मारतील हे म्हणताना, हे जे आहे ना, त्यात एक सुप्त राग असा आहे तो तुम्ही समजून घ्या. जे ते व्यक्त करत नाहीत. आमची आडनांव बघून तुम्हाला जात कळत नाही आमची? आणि तुम्ही आम्हाला काय विचारायला येता. हा एक वर्चस्ववाद असतो. आणि त्यात परत आणखी हा राग आहे की, आपलं वर्चस्व मोडीत काढलं गेलंय या संविधानाने. तो एक राग आहे. तो राग सगळा यातून दिसतो” असं म्हणत त्यांनी या प्रकरणाबाबत त्यांचं मत मांडलं.