गायक प्रथमेश लघाटे व गायिका मुग्धा वैशंमपायन हे दोघे गेले अनेक दिवस चांगलेच चर्चेत आहेत. दोघांनी लग्न केल्यापासूण् सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे. लग्नातील विधी व पारंपरिक लुकमुळे दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचबरोबर लग्नातील साधेपणाने दोघांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अशातच नुकताच त्यांच्या लग्नाला १ महिना पूर्ण झाला आणि या १ महिन्याच्या पूर्ततेनिमित्त त्यांनी त्यांच्या लग्नाच्या खास क्षणांचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर केला होता.
प्रथमेश-मुग्धा दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. दोघे त्यांच्या कार्यक्रमाविषयी तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधितही काही अपडेट्स चाहत्यांना देत असतात. दोघे त्यांच्या गाण्याचे काही व्हिडीओदेखील चाहत्यांबरोबर शेअर करत असतात आणि त्या दोघांची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना खूपच आवडते. अशातच मुग्धाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे तिने तिला प्रथमेशची आठवण येत असल्याचे म्हटले आहे.
आणखी वाचा – “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”
सध्या मुग्धा गायनाच्या कार्यक्रमासाठी अंदमान येथे गेली आहे. अंदमान येथील अनेक व्हिडीओ, फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर करत आहे. तसेच अंदमान येथे ती प्रथमेशला मिस करत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकतीच तिने तशी एक स्टोरीदेखील पोस्ट केली होती. अशातच आता तिने पुन्हा एकदा प्रथमेशचा एक व्हिडीओ शेअर करत तिला अंदमानात त्याची उणीव भासत असल्याचे म्हटले आहे.

आणखी वाचा – बायकोचा एकटेपणा प्रथमेश लघाटेलाही सहन होईना, अंदमानला गेल्यानंतर आठवणीत भावुक, म्हणाला, “मी पण…”
मुग्धाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात प्रथमेश त्याच्या गावी भजनात दंग झाला असल्याचे पाहायला मिळत आहे आणि हाच व्हिडीओ शेयर करत तिने असे म्हटले आहे की, “तिथे असणं हे मी मिस करत आहे”. मुग्धाची ही स्टोरी रिपोस्ट करत प्रथमेशदेखील मुग्धाला मिस करत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, प्रथमेश एका कार्यक्रमानिमित्त इंदोरला गेला होता. या त्याच्या इंदोरच्या प्रवासात त्याच्याबरोबर मुग्धा नसल्याने त्याला तिची आठवण येत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या.