शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : “जो भी हैं सब तेरा…” स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडिलही रडू लागले अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 27, 2023 | 10:07 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
ashish and swanandi new video viral on social media actor uday tikekar got emotional in daughter wedding

"जो भी हैं सब तेरा…" स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडिलही रडू लागले अन्…

Ashish Kulkarni and Swanandi Tikekar Wedding : मराठी मनोरंजन विश्वातील दोन लोकप्रिय जोडप्यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. गेले काही दिवस त्यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींनी त्यांच्या चाहत्यांना लग्नविषयी उत्सुकता लावली होती. अखेरीस या जोड्या विवाहबंधनात अडकल्या आहेत. त्या लोकप्रिय जोड्या म्हणजे गौतमी-स्वानंद आणि स्वानंदी-आशिष. त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण त्यांनी नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले असून या फोटो व व्हिडीओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. अशातच स्वानंदी-आशिष यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. (Ashish Kulkarni and Swanandi Tikekar On Instagram)

स्वानंदी-आशिष यांनी त्यांच्या लग्नातील विधींचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे यामध्ये आशिषने पत्नी स्वानंदीसाठी त्याच्या आवाजातले खास रोमँटिक गाणे गायले आहे तर स्वानंदीनेही या आपल्या नवऱ्याला गाण्यासाठी साथ दिली आहे. स्वानंदी-आशिष यांनी ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटातील ‘तेरे हवाले’ हे गाणं गायलं आहे. यावेळी स्वानंदीचे वडिल आपल्या लेकीच्या पाठवणीत भावुक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी त्यांनी आपल्या लेकीला घट्ट मिठीही मारली आहे.

View this post on Instagram

A post shared by Ashish Kulkarni (@ashishkulkarni.music)

आणखी वाचा – Video : भर मंडपातच आशिष कुलकर्णीने बायकोसाठी गायलं खास गाणं, स्वानंदी आनंदाने नाचू लागली अन्…; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण दाखवण्यात आले असून या दोघेही अत्यंत आनंदी दिसत आहेत. तसेच या व्हिडीओमध्ये स्वानंदीने लग्नासाठी खास गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर आशिषने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता व त्यावर स्वानंदीच्या साडीला साजेसा असा धोतर परिधान केला होता. अंत्यत पारंपरिक व आकर्षक अशा दोघांचा लग्नाचा लूक चाहत्यांनाही विशेष भावला आहे. त्याचबरोबर लग्नातील साधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

आणखी वाचा – “अनेकांना त्रास होतो पण…”, मराठी न बोलण्यावरुन सुनावणाऱ्यांवर अजिंक्य देव भडकले, म्हणाले, “हे लोक मराठी चित्रपट…”

दरम्यान, स्वानंदी-आशिष यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला मराठीतील अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. तसेच “खूप छान, खूप गोड दिसत आहात, शुभेच्छा, अभिनंदन” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Tags: Swanandi Tikekar and Ashish Kulkarni HaldiSwanandi Tikekar and Ashish Kulkarni Latest Marathi NewsSwanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage marathi newsSwanandi Tikekar and Ashish Kulkarni MehandiSwanandi Tikekar and Ashish Kulkarni PhotosSwanandi Tikekar and Ashish Kulkarni wedding marathi newsSwanandi Tikekar Weddingस्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी दोघे लग्नबंधनातस्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी फोटोस्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी यांचे लग्नस्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी लग्नस्वानंदी टिकेकर आशिष कुलकर्णी लेटेस्ट मराठी न्यूज
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding

"दुसऱ्याची झाली याचं दुःख आणि…", बहिणीच्या लग्नानंतर मृण्मयी देशपांडे भावुक, म्हणाली, "वेड्यासारखे वागलात तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.