सिने विश्वातील प्रत्येक कलाकारांचे ग्लॅमरस फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. त्यांचा प्रत्येक फोटो पाहण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात, तर या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून या फोटोंवर चाहत्यांकडून नेहमीच लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो. पण चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते कसे दिसायचे याबद्दलही चाहत्यांमध्ये उत्सुकता असते. अनेक कलाकारांचे पूर्वीचे आणि आत्ताचे फोटो व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा फोटो पाहून मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीला ओळखणं ही कठीण असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.(Abhidnya Bhave childhood photos)
ही अभिनेत्री तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. तर ती सध्या एक मजेशीर पण नकारात्मक पात्र साकारताना दिसते. यासोबत ती सोशल मीडियावर देखील कमालीची ऍक्टिव्ह असते. तर तिने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीत एक फोटो शेअर केला. हा त्या अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो असून ती अभिनेत्री या फोटोत खूपच क्युट दिसतेय. तर तुम्ही या अभिनेत्रीला ओळखलं का ? जर ओळखलं नसेल तर ही अभिनेत्री आहे अभिज्ञा भावे(Abhidnya Bhave childhood photo)

====
हे देखील वाचा – मल्टीटॅलेंटेड भाऊ! अभिनय, गायन, आणि आता भाऊंच्या वादनाच्या कलेचं कौतुक
====
हा फोटो अभिज्ञाने शेअर केला.”हा माझ्या खूप जुन्या अल्बम मधील एक फोटो आहे असं म्हणत तिने “हैप्पी बेबी” असं देखील म्हंटल आहे. यात तिने एक “को” ड्रेस घातलेला पाहायला मिळतोय. तर अभिज्ञा ही सध्या सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तर लग्नानंतर अभिज्ञा पुन्हा काम करणार की नाही अशी चर्चा सुरु झाली. अभिनयातून ब्रेक घेणार नसल्याचं अभिज्ञानं यावर सांगितलं होतं. ती सध्या छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी या मालिकेतून एका हटके भूमिकेत ती चाहत्यांसमोर येत आहे. या मालिकेत ती वल्ली हे पात्र साकारतेय.नकारात्मक भूमिका साकारताना ती असं का वागत असेल, त्यामागे विचार काय असेल, ती व्यक्तिरेखा कशामधून जात असेल, याचा विचार करून ती पडद्यावर रंगवायचा प्रयत्न करत असल्याचं अभिज्ञा सांगते.(Abhidnya Bhave childhood photo)