शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Gautami Deshpande and Swanand Tendulkar Wedding : गौतमीच्या संगीत सोहळ्यात आईने गायलं खास गाणं, आईच्या गाण्यावर देशपांडे सिस्टर्सनी धरला ठेका

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 25, 2023 | 12:47 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
mrunmayee and gautami deshpande danced on mothers song in sangeet ceremony

गौतमीच्या संगीत सोहळ्यात आईने गायलं खास गाणं, आईच्या गाण्यावर देशपांडे सिस्टर्सनी धरला ठेका

Swanand Tendulkar and Gautami Deshpande Wedding : अभिनेत्री गौतमी देशपांडे ही मराठी सिनेसृष्टीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते आणि गेले काही दिवस ती आणखीणच चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे तिचं लग्न. अभिनेत्री गेले काही दिवस तिच्या लग्नामुळे सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

अभिनेत्री अभिनेता व इन्फ्लुएंसर स्वानंद तेंडुलकरबरोबर रिलेशनमध्ये होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्या रिलेशनशिप बद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र गौतमीने याबद्दल कुठेही भाष्य केले नव्हते. पण गौतमीची बहीण मृण्मयीने त्यांच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात केल्यामुळे त्यांच्या रिलेशनविषयी व लग्नाविषयी साऱ्यांनाच खबर लागली. अशातच शनिवारी (२३ डिसेंबर) रोजी गौतमीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत अप्रत्यक्षपणे आपल्या प्रेमाची कबुलीदेखील दिली.

आणखी वाचा –  संगीत सोहळ्यासाठी स्वानंदी-आशिष यांचा वेस्टर्न अंदाज, झगमगीत कपडे अन् डायमंड ब्रेसलेट…

गेले दोन दिवस त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच एक व्हिडीओ सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नुकताच गौतमी-स्वानंद यनचा संगीत सोहळा पार पडला आणि सोहळ्यात त्यांच्या आईने खास गाणे गायले. गौतमीच्याअ आईने आशा भोसले यांचं ‘आओ हुजूर तुमको’ हे लोकप्रिय गाणं गायलं. आई गातानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये गौतमी व बहीण मृण्मयी दोघी एकमेकींचा हात धरून थिरकत आहेत.

आणखी वाचा – मॉडर्न अंदाजात थिरकले गौतमी-स्वानंद, संगीत सोहळ्यामधील व्हिडीओ आला समोर, पाहा खास क्षण

दरम्यान,  गौतमी-स्वानंद यांनी त्यांच्या या खास संगीत सोहळ्यासाठी विशेष लूक केला होता. त्यांचा हा खास लूक अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. गौतमी-स्वानंदीच्या संगीत सोहळ्यातील हे खास क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. त्यांच्या अनेक चाहत्यांनी या फोटो व व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला. तसेच त्यांचे हे खास फोटो व व्हिडीओ पाहून त्यांचे अनेक चाहते दोघांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.      

Tags: Gautami Deshpande and Swanand Tendulkar HaldiGautami Deshpande and Swanand Tendulkar Latest Marathi NewsGautami Deshpande and Swanand Tendulkar Marriage marathi newsGautami Deshpande and Swanand Tendulkar MehandiGautami Deshpande and Swanand Tendulkar PhotosGautami Deshpande and Swanand Tendulkar wedding marathi newsgautami deshpande weddingगौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर दोघे लग्नबंधनातगौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर फोटोगौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर यांचे लग्नगौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर लग्नगौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर लेटेस्ट मराठी न्यूज
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Marriage Marathi News

Swanandi Tikekar and Ashish Kulkarni Wedding : स्वानंदी-आशिषच्या संगीत सोहळ्यात 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या टीमसह थिरकले कुटुंबीय, व्हिडीओ होतोय व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.