शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लाडक्या लेकीसह रुग्णालयामधून घरी परतली सई लोकूर, इतका बदलला आहे लूक, मुलीबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 21, 2023 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress sai lokur shared photo with her new born beby girl

लाडक्या लेकीसह रुग्णालयामधून घरी परतली सई लोकूर, इतका बदलला आहे लूक, मुलीबरोबर शेअर केलेला फोटो चर्चेत

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या कार्यक्रमातून सई चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. गेल्या अनेक दिवसांपासुन सईचे प्रेग्नंसी फोटोशूट चांगलेच चर्चेत होते. अशातच तिने नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती. १७ डिसेंबर रोजी तिला कन्यारत्न प्राप्त झाले होते. आई झाल्याची गुडन्यूज सांगत तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती.  (Sai Lokur On Instagram)

सईने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, “आमच्या बाळाच्या येण्याची बातमी सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आई व बाळ दोघंही सुखरुप आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.” या पोस्टला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच नुकताच सईने तिच्या मुलीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. सईने हॉस्पिटलबाहेरचा एक फोटो शेअर करत “आम्ही घरी येत आहोत” असं म्हटलं आहे. या फोटोमध्ये सईच्या हातात तिचे बाळ व नवरादेखील दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

या खास पोस्टसह तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरीदेखील पोस्ट केली आहे. यात तिने असे म्हटले आहे की, “तुम्ही सर्वांनी दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छाबद्दल धन्यवाद. तुमचे हे प्रेम पाहून मी खूप भारावून गेले आहे. आम्ही दोघीही आता सुखरूप असून घरी आलो आहोत आणि आराम करणार आहोत. थोडी विश्रांती घेऊन मी पुन्हा येईन.” यापुढे तिने पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद म्हटले आहे.       

दरम्यान सईने तिच्या बाळाबरोबर शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. मराठीतील अनेक कलाकार मंडळींसह तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत सईचे अभिनंदन केले आहे. तसेच “तू खूप छान दिसत आहेस, बाळाला आणि तुला नजर लागायला नको, दोघांना खूप शुभेच्छा आणि प्रेम” अशा अनेक कमेंट्स करत सईचे कौतुक व अभिनंदन केले आहे.

Tags: entertainmententertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi newssai lokur
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
ankita lokhande and vicky jain

Bigg Boss 17 : विकी जैनबरोबर अंकिता लोखंडे घटस्फोट घेणार, 'बिग बॉस'च्या घरातच केला खुलासा, म्हणाली, "तुझ्याबरोबर परत मी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.