मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. सुरुवातीला प्रसाद जवादे-अमृता देशमुख यांच्या शाही लग्नसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर सुरुची अडारकर-पियुष रानडे यांनी त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अशातच आता आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. (Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Wedding)
आमचं ठरलं असं म्हणत एकत्र फोटो शेअर करत मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या होत्या. अशातच गायक प्रथमेश लघाटेने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रथमेशने शेअर केलेली पोस्ट पाहता, मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे.
आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ
प्रथमेशने “हरिद्रा लापन. मांगलिक स्नान” असं कॅप्शन देत हळदीच्या पाण्याने अंघोळ करतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यावरून प्रथमेशला हळद लागली असल्याचं समोर आलं आहे. शिवाय मुग्धाने ही तिच्या सोशल मीडियावरून हळदीचे खास क्षण शेअर केले आहेत. अखेर मुग्धा व प्रथमेश विवाहबंधनात अडकणार असल्याची आनंदाची बातमी त्यांनी शेअर केलेल्या हळदीच्या फोटोंवरून समोर आली आहे. दरम्यान या पोस्ट पाहून चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव करायला सुरुवात केली आहे.
प्रथमेश व मुग्धा यांचा अगदी पारंपरिक पद्धतीने हळदी समारंभ पार पडला आहे. दोघांनी त्यांच्या हळदी समारंभाचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांनाही आनंदाचा धक्का दिला आहे. दोन दिवसांपासून त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली होती. व्याहीभोजनाचे फोटोही दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केले होते.