लहानपणा पासून पाहत आलेले असंख्य सिनेमे आवाज ज्यांच्यामुळे सत्यात उतरले ते व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय चित्रपटाचे जन्मदाते दादासाहेब फाळके. चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते म्हणून जसजशी चित्रपट सृष्टी बहरत गेली तसेतसे दादासाहेबांचे नाव मोठ्या कार्यक्रमांसाठी वापरले जाऊ लागले. पण कधी कधी अजरामर नावं बदनाम करण्याचा घाट काही ठिकाणी घातला जातो. असच काहीस घडलाय मानाच्या दादा साहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कारा बाबत.(Dadasaheb Phalke Award Controversy)
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादा साहेब फाळके यांच्या नावाने अनेक बनावट पुरस्कार इंडस्ट्रीत दिले जातात. या सोहळ्यांची मोठी मंडईचं इंडस्ट्रीत आहे. सीबीएफसीच्या सदस्य असलेल्या वाणी त्रिपाठी टिक्कू यांच्यापासून ते माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनीच या पुरस्कार सोहळ्यांवर आक्षेप नोंदवले आहेत. एवढंच काय तर खुद्द दादासाहेब फाळके यांच्या कुटूंबियांनी सुद्दा या बाबत खंत व्यक्त केली आहे.

माहिती व प्रसारण मंत्रालय हे भारत सरकारचे एक मंत्रालय आहे जे माहिती, प्रसारण, प्रेस आणि भारतीय सिनेमा या क्षेत्रातील नियम व कायदे तयार करण्यासाठी व त्यातील कारभारासाठी जबाबदार आहे. परंतु हे मंत्रालय कायदेशीररित्या या बनावट पुरस्कार सोहळ्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. कारण या पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या खासगी संस्था पुरस्काराच्या नावात बारीक सारीक बदल करून हातावर तुरी देत स्वतःची सुटका करून घेतात. यात एक विशेष गोष्ट अशी आहे की, म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडचे प्रसिद्ध सेलिब्रिटीही सहभागी होत असतात.
====
हे देखील वाचा- आत्ता ‘या’ कारणानेही प्राजक्ता माळी झाली ट्रोल
====
नक्की काय घडलंय प्रकरण(Dadasaheb Phalke Award Controversy)
नुकतेच ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला काही दिग्गज आणि नामवंतांनी हजेरी लावली होती. दादासाहेब फाळके यांच्या नावावर दिल्या जाणाऱ्या खऱ्या पुरस्काराची सुरुवात १९६६ मध्ये झाली. भारत सरकारच्या माहिती मंत्रालयाकडून चित्रपटसृष्टीत महत्वाचे योगदान देणाऱ्या दिग्गज कलाकारांना या पुरस्काराने सन्मानित केले जाते. वाणी त्रिपाठी टिक्कू यांच्या मते हे कार्यक्रम चुकीच्या माध्यमातून घडवले जातात. खुद्द दादासाहेब फाळके यांचे नातेवाईक सुद्धा या पुरस्कारांना विरोध करत आहेत. मात्र, असे असतानाही खासगी संस्था नावात बदल करून असे पुरस्कार सोहळे आयोजित करत आहेत.

दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी नुकतेच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मुंबई येथे झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्यात मला अनेकांनी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. मी पाहिलं की पैसे घेतल्यानंतर अशा लोकांना पुरस्कार दिले जात आहेत जे या पुरस्काराच्याही लायक नाहीत. हे सगळं पाहिल्यावर मी अशा कोणत्याही अवॉर्ड फंक्शन्सला जाणं बंद केलं.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एकदा एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला फोन आला की ती अमेरिकेतील दादासाहेब फाळके पुरस्काराच्या आयोजकाला भेटली आहे आणि पुरस्कारासाठी दहा लाखांची मागणी करत आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि नंतर खूप वाईट ही वाटले. असं त्यांनी म्हंटल आहे. आता या बद्दल महाराष्ट्रातील सरकार काही कठोर पाऊल उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरेलं.
=====
हे देखील वाचा- खारी-बिस्किटाच्या पॅकेटवर अंतराचा फोटो: एक वेगळंच स्वप्न झालं पूर्ण
=====
भारतात चित्रपटाला जन्म देणाऱ्या जन्मदात्याच्या नावाची ही हेळसांड कोणताही कलाप्रेमी सहन करणार नाही एवढं नक्की.