शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

इंडिगो कंपनीवर भडकला कपिल शर्मा, व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी अभिनेत्यालाच केलं ट्रोल, म्हणाले, ” तू शोमध्ये जसं वागतोस तसं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 30, 2023 | 2:02 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Kapil Sharma Troll

इंडिगो कंपनीवर भडकला कपिल शर्मा, व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांनी अभिनेत्यालाच केलं ट्रोल, म्हणाले, " तू शोमध्ये जसं वागतोस तसं…"

प्रसिद्ध विनोदवीर व अभिनेता कपिल शर्मा त्याच्या ट्विटमुळे चर्चेत आला आहे. ‘इंडिगो फ्लाइट’बाबत ट्विट करत शेअर केलेल्या व्हिडीओमुळे त्याने संताप व्यक्त केला आहे. या फ्लाइटमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कपिल शर्माने याचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने त्रासलेले प्रवासी दाखवले आहेत. अभिनेत्याने इंडिगो फ्लाइटवर याबाबत राग व्यक्त केला आहे. (Kapil Sharma Troll)

कपिल शर्माने विमानतळावरील काही व्हिडिओही शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्रवासी चिंतेत असलेले स्पष्टपणे दिसत आहेत. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत कपिल शर्माने लिहिले आहे की, “प्रिय इंडिगो, आधी तुम्ही आम्हाला बसमध्ये ५० मिनिटे थांबायला लावले आणि आता तुमची टीम म्हणतेय की पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे. काय? खरंच? आम्ही ८ वाजता टेक ऑफ करणार होतो, पण आता ९:२० झाले आहेत. तुम्हाला असं वाटत आहे का, हे १८० प्रवासी इंडिगोमध्ये पुन्हा उड्डाण करतील? याचबरोबर त्याने ‘शेमलेस’ असे लिहिले आहे. सदर व्हिडीओ त्याने इंडिगो फ्लाइटला (#indigo 6E 5149 #shameless) टॅग केला आहे.

आणखी वाचा – “काय कमाल आहे ना बायकांची…”, अभिनेत्रींचे फोटो शेअर करत सिद्धार्थ चांदेकरचं वक्तव्य, म्हणाला, “संकटाच्या, दुःखाच्या काळात…”

कपिल शर्माच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. दरम्यान शेअर केलेल्या व्हिडीओवरून कपिलवर पलटवार झाला असल्याचं पाहायला मिळत आहे. कपिलच्या या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “कपिलजी, तुमच्या शोच्या शूटिंगदरम्यान लोकांना जास्त वेळ वॉशरूम वापरण्याचीही परवानगी नाही. कृपया शांत राहा आणि अतिशयोक्ती टाळा. बरेचदा एक भारताचा सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकजण रोज यासारख्या अनेक अडचणींचा सामना करत असतो. शांत राहा” असं म्हणत कपिलला शांत केलं आहे.

Dear @IndiGo6E first you made us wait in the bus for 50 minz, and now your team is saying pilot is stuck in traffic, what ? Really ? we supposed to take off by 8 pm n it’s 9:20, still there is no pilot in cockpit, do you think these 180 passengers will fly in indigo again ? Never…

— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2023

आणखी वाचा – लहान असताना अशा दिसायच्या ऐश्वर्या नारकर, एका गोष्टीसाठी आई-वडिलांचेही मानले आभार, म्हणाल्या, “त्यांनी माझे…”

Now they r de boarding all the passengers n saying we will send you in another aircraft but again we have to go back to terminal for security check ???????????????????? #indigo???? pic.twitter.com/NdqbG0xByt

— Kapil Sharma (@KapilSharmaK9) November 29, 2023

तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत, ‘तू सुपरस्टार आहेस. लोक तुझं उदाहरण घेऊन अनुसरण करतात. म्हणून, प्रतिकूल परिस्थितीत तुझी सर्वोत्तम बाजू दाखव. तू नव्या श्रीमंतांसारखे वागत आहेस. तू कॉमेडी नाईटमध्ये जसं वागतोस तसं सगळीकडे वागू नकोस. काळजी घे” असं म्हणत कपिलला खडेबोल लगावले आहेत.

Tags: bollywood actorkapil sharmakapil sharma trollkapil sharma video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
satvya mulichi satvi mulgi fame actress aishwarya narkar answered to trollers

"एक डान्सर, एक जोकर”, ऐश्वर्या नारकरांचा नवऱ्यासह भन्नाट डान्स, ट्रोल करणाऱ्याला उत्तर देत म्हणाल्या, “कसं बोलायचं हेच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.